Crime-Scene 
पुणे

गृहकर्जाच्या नावाखाली महिलेने बॅंकेला घातला 40 लाख 64 हजार रुपयांना गंडा

सकाळवृत्तसेवा

पुणे - गृहकर्जाच्या नावाखाली बॅंकेत बनावट कागदपत्रे सादर करून एका महिलेने बॅंकेला तब्बल 40 लाख 64 हजार रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी बॅंकेच्यावतीने स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याप्रकरणी हरेराम सिंग (वय 49, रा. हडपसर) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन 33 वर्षीय महिलेविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे शंकरशेठ रस्त्यावरील स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये वरिष्ठ अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. संशयित आरोपी महिलेने आंबेगाव येथील बांधकाम प्रकल्पामध्ये एक सदनिका घेतली होती. संबंधीत सदनिकेचे दस्त दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदविण्यात आले होते.

या दस्ताची बनावट कागदपत्रे बनवून महिलेने फिर्यादी यांच्या बॅंकेकडे गृहकर्जासाठी अर्ज केला होता. गृहकर्ज 39 लाख 92 हजार व 72 हजार रुपये विमा असे एकूण 40 लाख 64 हजार रुपयांचे कर्ज मंजुर करून घेतले. संबंधीत महिलेच्या कागदपत्रांची तपासणी करीत असताना तिने बनावट कागदपत्रे बॅंकेत सादर केल्याचे बॅंकेच्या निदर्शनास आले. त्यानंतर बॅंकेतर्फे तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक सुरेश जायभाय करत आहेत. 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: सत्तेचा काटा फिरवणार! काँग्रेस–वंचितची आघाडी कुणाचं गणित बिघडवणार? मुंबईची राजकीय सत्तासमीकरणं हादरली

Daulatabad News : वेरूळ, देवगिरी परिसर ‘हाउसफुल्ल’; घाटात वाहनांच्या रांगा; सलग सुट्यांचा परिणाम

Vastu Shastra: आठवड्याच्या 'या' दिवसांत पैशाचे व्यवहार करू नका, वास्तुशास्त्रात सांगितले महत्त्वाचे नियम

Horoscope : 2026 वर्ष सुरू होताच बनतोय लक्ष्मी-कुबेर धनलाभ योग; 6 राशींच्या लोकांना मिळणार भरपूर पैसा, अडकलेली कामे होणार पूर्ण

Latest Marathi News Live Update : राज ठाकरेंना पश्चाताप होईल, असे जागावाटप, उदय सामंतांची टीका

SCROLL FOR NEXT