sakal-impact 
पुणे

शिक्षण उपसंचालक कार्यालयांची झाडाझडती

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शिक्षण उपसंचालक कार्यालयात सुरू असलेला बाजार रोखण्यासाठी सध्याचे प्रभारी उपसंचालक आणि अन्य सहायक शिक्षण उपनिरीक्षक यांच्या बदलीबरोबरच विभागीय चौकशीचा प्रस्ताव शिक्षण आयुक्त कार्यालयाने शालेय शिक्षण विभागाच्या सचिव वंदना कृष्णा यांच्याकडे पाठविला आहे. तसेच, राज्यातील सर्वच उपसंचालक कार्यालयांची तपासणी करण्यासाठी संचालक स्तरावरील अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले असून, या तपासणीचा अहवाल ३१ डिसेंबरपूर्वी सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

उपसंचालक कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली. यात पैसे स्वीकारताना एका शिपायाला अटक केली. त्यानंतर या विभागात चालणाऱ्या गैरप्रकाराला ‘सकाळ’ने वाचा फोडली. या गैरप्रकारांच्या पद्धती समोर आणल्या. त्याची गंभीर दखल शिक्षण आयुक्त सोळंकी यांनी घेतली आणि शिक्षण उपसंचालक प्रवीण अहिरे यांच्यासह एका कर्मचाऱ्याची बदली आणि चौकशीचा प्रस्ताव मान्यतेसाठी शिक्षण विभागाकडे पाठविला असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. आता सर्व कार्यालयांमध्ये तीन वर्षांपासून एकाच ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

दरम्यान, प्रत्येक जिल्ह्यातील उपसंचालक कार्यालय हे तीन जिल्ह्यांतील शिक्षक, संस्था यांच्याशी संबंधित कामे करीत असते; परंतु कोणतेही काम विहित वेळेत केले जात नाही, त्यासाठी मोठ्या रकमांची मागणी केली जाते, असे सरकारी यंत्रणेच्या निदर्शनास आले. त्यासाठी राज्यातील सर्व उपसंचालक कार्यालयांची तपासणी करण्याचा आदेश आयुक्त सोळंकी यांनी दिला आहे. पुणे आणि मुंबई विभागातील कार्यालये तपासण्यासाठी शिक्षण संचालक दिनकर पाटील, सोलापूर- लातूरसाठी दिनकर टेमकर, नागपूर- अमरावतीसाठी दत्तात्रेय जगताप, सोलापूर- नाशिकसाठी व्ही. के. खाडके यांना तपासणी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT