Chemist Dr. Soumitra Athavale from Pune completed the Chemistry Challenge alone in 96 hour 
पुणे

पुण्याच्या डॉ. सौमित्रचा जगभरात डंका! 96 तासांत रसायनशास्त्राचे चॅलेंज केले पुर्ण

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचा (आयसर) माजी विद्यार्थी असलेल्या पुणेकर डॉ. सौमित्र आठवलेंच्या बुद्धिमत्तेचा डंका जगभरात वाजला आहे. रसायनशास्त्रात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या 'मर्क कंपाउंड चॅलेंज' या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आठवले याने बाजी मारत जगभरातील तब्बल 132 संघांना नमवले आहे. एका विशिष्ट रसायनांच्या निर्मितीचा मार्ग सौमित्रने 96 तासाच्या स्पर्धेत यशस्वीरीत्या शोधला आहे. 

सौमित्रचे वडील प्रा. विनायक आठवले सांगतात,""लहानपणापासूनच संशोधनात करिअर करायचे ठरविल्यामुळे आयआयटीत मिळणारा प्रवेश नाकारून सौमित्रने "आयसर'मध्ये पदवी शिक्षण घेऊन संशोधनात करिअर करण्याचा निर्णय घेतला.

हे वाचा - Corona - पुढचे चार ते सहा महिने खूप वाईट असू शकतात; बिल गेट्स यांचा इशारा

रसायनशास्त्रज्ञ प्रा. स्कॉट डेन्मार्क यांच्याकडे त्याने पीएचडी केली आणि विविध शोधनिबंध शाधपत्रिकांमध्ये प्रसिद्ध केले.'' आयसरमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर सौमित्रने अमेरिकेतील इलिनॉय विद्यापीठात पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले. सध्या कॅल्टेक येथे नाबेल विजेत्या प्रा. फ्रान्सिस अर्नोल्ड यांच्याकडे तो पोस्टडॉक करत आहे.

सौमित्रने शोधलेला रासायनिक मार्ग हा सर्वोत्तम ठरला आहे. त्याच्यासोबत जर्मनीतील एक चमूही विजेता ठरला. या दोन्ही चमूंना दहा हजार युरोचे बक्षीस विभागून देण्यात आले. सौमित्र सध्या कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी येथे पोस्ट डॉक्‍टरल स्कॉलर आहे. 

हे वाचा - गेल्या वर्षीच्या तुलनेत कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण तब्बल ७ टक्क्यांनी कमी झाले

काय आहे "मर्क कंपाउंड चॅलेंज' ? 
- रसायनशास्त्रातील प्रसिद्ध संस्थेतर्फे जगभरातील संशोधकांना एक विशिष्ट प्रकारचा रसायनशास्त्राचे उदाहरण दिले जाते. 
- एखादा विशिष्ट रसायन (कंपाउंड) विकसित करण्यासाठी छोट्या रेणूला त्याचा प्रवास करण्यासाठी रसायनशास्त्राचा आधार घेत सर्वोत्तम असा मार्ग निर्माण करून द्यायचा असतो. 
- यासाठी स्पर्धकांना 96 तासांचा अवधी दिला जातो. स्पर्धेत वैयक्तिक किंवा संघासह सहभागी होता येते. 
- स्पर्धेच्या पहिल्या भागात प्रत्येक स्पर्धकाला उर्वरित आठ जणांचा रासायनिक मार्ग तपासायला दिला जातो. त्यातून सर्वोत्तम दहा स्पर्धक निवडले जातात. दुसऱ्या भागात या दहा स्पर्धकांचे रासायनिक मार्ग जर्मनी येथे मर्कच्या प्रयोगशाळेत प्रत्यक्ष तपासला जातो. 
- विजेत्यांना दहा हजार युरोचे बक्षीस दिले जाते.
 
''आयसरमध्ये रचला गेलेला संशोधनाचा पाया यासाठी खूप उपयुक्त ठरला आहे. तरुण विद्यार्थ्यांनी आपल्याला आवडेल त्या क्षेत्रात करिअर करावे. हे करत असताना त्यामध्ये झोकून देण्याची तयारी असावी. याचबरोबर परिस्थिती आणि व्यवहार्यता याचा विचार करूनही निर्णय घ्यावा. ''
- डॉ. सौमित्र आठवले, संशोधक. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT