Chhagan Bhujbal Disobey the orders of the Chief Minister Uddhav Thackeray 
पुणे

CoronaVirus : मुख्यमंत्र्याच्या आदेशाला भूजबळांनी दाखवली केराची टोपली 

सकाळवृत्तसेवा

हडपसर(पुणे) : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले असाताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नूतन इमारत आणि महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यामुळे भुजबळ यांनी मुख्यमंत्र्याच्या आदेशाला केराची टोपरी दाखवल्याची चर्चा रंगली. तर संस्थेचे सदस्य अजित ससाणे यांनी या कार्यक्रमाची प्रसिध्दी होवू नये यासाठी पत्रकारांना हाकलून दिले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  ससाणे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या ज्युनिअर कॉलेजच्या नवीन इमारतीचे उदघाटन व महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण भुजबळ यांच्या हस्ते झाले, याप्रसंगी ते बोलत होते. कोराना वायरसची साथ आल्यामुळे केवळ दोन मिनिंटातच कार्यक्रम भुजबळ यांनी उरकला.  कोरोना प्रतिबंधक साहित्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा,  भुजबळ यांनी हडपसर यावेळी बोलताना दिला.

Coronavirus : कोरोनाचे राज्यात थैमान; पुण्यात तर...
या कार्यक्रमाचे संयोजन ससाणे एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष गोरखनाथ ससाणे, बाळासाहेब ससाणे, सागर ससाणे, मंगेश ससाणे, विजय ससाणे, प्राचार्य शोभा नायर, प्राचार्य भानुमती नायडू व शिक्षकांनी केले. याप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत हरी नरके, आमदार चेतन तुपे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार योगेश टिळेकर, महादेव बाबर, जगन्नाथ शेवाळे, नगरसेवक वैशाली बनकर, योगेश ससाणे, नगरसेवक मारुती तुपे, पूजा कोद्रे, उज्वला जंगले, अशोक कांबळे, माजी नगरसेवक दत्तोबा शिंदे, विजया वाडकर, फारूक इनामदार, सुनिल बनकर, बाळासाहेब गोंधळे, जयसिंग गोंधळे उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Parth Bhut? : तोच गोलंदाज, OUT ही तसाच झाला... Shubman Gill चे रणजी करंडक स्पर्धेतील पुनरागमन अपयशी; पंजाबचा संघ हरला

Latest Marathi News Live Update : राहाता तालुक्यात बिबट्यांचा मुक्तसंचार

Government Job: ना परीक्षा, ना मुलाखत.. थेट केंद्राची नोकरी! पोस्टात 'या' पदांसाठी निघाली भरती

Thane Mayor: ठाणे महापालिकेत ३० वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती, अनुसूचित जातीला मिळणार महापौर पदाचा मान

Cyber Crime : ‘ई-चलान’चा मेसेज, एका क्लिकने झालं खातं रिकामं! मोबाईल हॅकिंगचा वाढता धोका,सामान्य नागरिक बनतोय बळी

SCROLL FOR NEXT