Chhatrapati Sambhaji Maharaj Sakal
पुणे

वढु बुद्रुक : छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्यदिव्य स्मारकाला मंजुरी

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत, महाराष्ट्राची अस्मिता आहेत असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

दत्ता लवांडे

पुणे : हवेली तालुक्यातील वढु बुद्रुक (Vadhu Budruk) येथे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक ( Chhatrapati Sambhaji Maharaj statue) उभारणीच्या कामाला उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांनी मंजूरी दिली आहे. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. महाराष्ट्राची अस्मिता आहेत. स्वराज्याच्या रक्षणासाठी, विस्तारासाठी त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे.

साकारण्यात येणारे स्मारक त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारे, त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे, भव्य दिव्य असले पाहिजे. या स्मारकाच्या आराखड्यासाठी स्पर्धेचे आयोजन करुन त्यातून सर्वोत्कृष्ट आराखड्याची निवड करण्यात यावी. तसेच हे काम करताना स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेण्यात यावा असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

स्मारकाच्या संदर्भात महत्त्वाचे मुद्दे

  • वढु बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांची योग्य सोय व्हावी, याची काळजी घेण्यात यावी.

  • स्मारक उभारताना त्याला ‘हेरिटेज’ टच असावा.

  • स्मारकाचे काम करताना छत्रपती संभाजी महाराजांच्या समकालीन वास्तुरचनांचा आधार घ्यावा.

  • छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे पावित्र्य जपून परिसराच्या विकासाचे काम, सर्वांच्या संमतीने, सर्वांना सोबत घेऊन भव्यदिव्य स्वरुपात करण्यात यावे.

  • स्मारकाची उभारणी भव्यदिव्य करण्यासाठी स्मारकाच्या आराखड्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे.

स्पर्धेतून निवडणार सर्वोत्कृष्ट आराखडा

या स्मारकाचा विकास करण्यासाठी आणि सर्वोत्कृष्ट आराखड्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे आणि यातील सर्वोत्कृष्ट आराखडा निवडून तो विकासासाठी वापरावा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Ambegaon Crop Insurance: पावसाने दगा दिला तर आधार मिळणार; आंबेगावातील ६,८६३ शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच

Purna River Crisis: कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पूर्णा नदीचे पाणी वाहून गेले

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

SCROLL FOR NEXT