Janta Raja Mahanatya sakal
पुणे

Janta Raja Mahanatya : छत्रपती शिवरायांची तेजस्वी जीवनगाथा उलगडणार

छत्रपती शिवाजी महाराजांची अलौकिक अन् तेजस्वी जीवनगाथा अनुभवण्याची संधी पुणेकर रसिकांना मिळणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांची अलौकिक अन् तेजस्वी जीवनगाथा अनुभवण्याची संधी पुणेकर रसिकांना मिळणार आहे. हिंदवी स्वराज्य निर्मितीचा प्रवास भव्य पद्धतीने उलगडणारे ‘जाणता राजा’ हे महानाट्य पुणेकरांच्या भेटीस आले आहे.

सकाळ माध्यम समूहातर्फे १५ ते १९ मे या कालावधीत कोथरूडच्या वनाज मेट्रो स्टेशनजवळील सूर्यकांत काकडे फार्म्स येथे या महानाट्याच्या प्रयोगांचे आयोजन केले आहे. दररोज सायंकाळी ६ वाजता या महानाट्याचा प्रयोग सादर होणार आहे. या कार्यक्रमाची तिकीट विक्री भरघोस प्रतिसादात सुरू झाली आहे.

‘जाणता राजा’ हे महानाट्य आता बाराशे प्रयोगांच्या उंबरठ्यावर आहे. ‘सकाळ’तर्फे आयोजित प्रयोगांदरम्यान हा टप्पा गाठला जाईल. त्यामुळे रसिकांना या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी लाभणार आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे निर्मित ‘जाणता राजा’ हे आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतच्या प्रसंगांची मांडणी या महानाट्यात करण्यात आली आहे.

भव्य नेपथ्य, चपखल वेशभूषा, उंट, घोडे यांसह सादर होणाऱ्या या महानाट्यातून ऐतिहासिक प्रसंग हुबेहूब साकारले जातात. कुटुंबातील तिन्ही पिढ्यांनी एकत्र अनुभवावी, अशी ही महागाथा आहे. त्यातच यंदा सुट्ट्यांच्या कालावधीत या महानाट्याचे प्रयोग होत असल्याने पुणेकरांनी अवश्य सहकुटुंब या हिंदवी स्वराज्याच्या महानाट्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन ‘सकाळ’तर्फे करण्यात आले आहे.

‘जाणता राजा’ महानाट्याची वैशिष्ट्ये

  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या प्रसंगांचे सादरीकरण

  • पाचमजली भव्य फिरता सेट

  • दोनशेहून अधिक कलाकारांचा समावेश

  • उंट, घोडे आदी प्राण्यांचाही सहभाग

  • लहानांपासून थोरांपर्यंत, प्रत्येकाने घ्यावा असा भव्य अनुभव

महानाट्याविषयी

  • काय : ‘जाणता राजा’ महानाट्य

  • कधी : १५ ते १९ मे, २०२४

  • केव्हा : दररोज सायंकाळी ६ वाजता

  • कुठे : सूर्यकांत काकडे फार्म्स, वनाज मेट्रो स्टेशनजवळ, कोथरूड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : नीलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल; दुसऱ्याच्या आधारकार्डावर घेतले सिमकार्ड, बँक खात्यांतून फसवणूक

NHAI on Dirty Toilets : 'हायवे'वरील घाणेरड्या शौचालयाची माहिती द्या, अन् बक्षीस म्हणून मिळवा FASTag साठी एक हजाराचं रिचार्ज!

HSC SSC Exam : बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून; तर दहावीची २० फेब्रुवारीपासून होणार सुरू

PF withdrawal latest Update : दिवाळीआधी केंद्र सरकारकडून नोकरदारवर्गास ‘GOOD NEWS’ ; 'PF'ची १०० टक्के रक्कम काढता येणार!

Sangli News : ‘पावती करायची नाय...’ ही एक ‘रील’ पडली महागात

SCROLL FOR NEXT