Crime_Pune 
पुणे

'तो' गोट्याला भेटला म्हणून छोट्याने 'त्याची' तीन बोटे छाटली

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पूर्व वैमनस्य असलेल्या गोट्या नावाच्या व्यक्तीला भेटल्याने अभिषेक ऊर्फ छोट्या अलटे या आरोपीने एकावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात गणेश तेजबहाद्दूर ठाकूर (वय 25, रा.बिबवेवाडी) याची तीन बोटे तुटली आहेत.

रविवारी (ता.6) रात्री अकरा वाजता वानवडी येथील नेपियर रस्त्यावर ही घटना घडली. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी गणेश हा त्याच्या तोंड ओळखीच्या गोट्या नावाच्या व्यक्तीला रस्त्यात गळा भेट घेऊन भेटला होता. त्याचा अभिषेक ऊर्फ छोट्या अलटे आणि अनिकेत ऊर्फ अँण्डी अलटे या दोघांना राग आला होता. त्यांनी गणेश याला याचा जाब विचारत धमकावले. त्यावरून वाद झाल्याने अँण्डीने गणेशला शिवीगाळ करत कॉलर पकडली. तर छोट्याने मागून येत धारदार शस्त्राने डोक्‍यात आणि हाताच्या बोटावर वार केले. यात गणेश यांची करंगळी आणि शेजारील दोन बोटे तुटून पडली आहेत. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक भगवान कांबळे करत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'बिघाडी'वर मतदारांचा बुलडोझर! पाली पोटनिवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा फडकला; शेकाप-भाजप-राष्ट्रवादी समीकरण कोसळले

vaibhav sooryavanshi च नाही, तर भारताच्या बाकी फलंदाजांनीही श्रीलंकन गोलंदाजांना झोडलं अन् उभं केलं डोंगराएवढं लक्ष्य

'पहिलीच डेट आणि समीरला माझ्यासमोरच पॅनिक अ‍ॅटक आला' अशी होती नीलम कोठारी-समीर सोनीची पहिली भेट

Video: पवारांच्या खासदाराचा नादच वेगळा! खऱ्याखुऱ्या 'टायगर'च्या गळ्यात पट्टा बांधून मारला फेरफटका; व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार - भास्कर जाधव

SCROLL FOR NEXT