CM Eknath Shinde Esakal
पुणे

Navale Bridge Accident: नवले ब्रीजवर झालेल्या अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून दखल

चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या तब्बल २४ वाहनांना अक्षरशः उडविले

अंकिता खाणे (Ankita Khane)

साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकचा काल रविवारी रात्री पावणेनऊ वाजता नवले पुलाजवळ ब्रेक निकामी झाला. त्यामुळे चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या तब्बल २४ वाहनांना अक्षरशः उडविले. या भीषण अपघातात ८ ते १० जण गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात कार, रिक्षा, दुचाकी अशा वाहनांचा चक्काचूर झाला. या घटनेमुळे महामार्गावर ४ ते ५ किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

दरम्यान या अपघाताविषयी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांकडून माहिती घेतली असून, हा अपघात कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला तेही तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच अपघातातील जखमींना योग्य ते उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देखील त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. अपघातामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर झालेली वाहतूक कोंडी दूर करून वाहनधारकांना त्रास होणार नाही हे पाहण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत

कायम अपघात प्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) अशी ओळख असलेल्या नवले पुलाचा परिसर रविवारी रात्री पुन्हा एकदा हादरला. रविवारी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनरचा ब्रेक अचानक निकामी झाला. त्यामुळे चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या २४ वाहनांना उडविले. ही वाहने एकमेकांना धडकल्याने रस्त्यावर, रस्त्याच्या बाहेर फेकले गेले. हा अपघात इतका भीषण होता की, त्यामध्ये सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मोठ्या कारचाही अक्षरशः चक्काचूर झाला होता.

या अपघातात एक रिक्षा व २३ कारचे नुकसान झाले. अपघात घडल्यानंतर वाहने रस्त्यांवर इतरत्र पडले होते. त्यामध्ये चालक, सहप्रवासी, प्रवासी अडकून पडले आहेत का?, याचा शोध घेत रस्त्याने जाणारे वाटसरू, स्थानिक नागरिक, प्रवासी, आजूबाजूचे व्यावसायिक, अग्निशामक दल, वाहतूक शाखा, सिंहगड रोड व दत्तवाडी पोलिस घटनास्थळी मदतीला धावून आले. त्यांनी वाहनांमध्ये अडकलेल्यांना तत्काळ बाहेर काढून त्यांना तेथे आलेल्या ८ ते १० रुग्णवाहिकांतून उपचारांसाठी रुग्णालयात पाठविण्यात येत होते.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik UPSC Exam: दोन मिनिटे उशीर अन् UPSC परीक्षा हातातून गेली! नाशिकमध्ये विद्यार्थी-पालक आक्रमक! खड्डे, पाऊस, ट्रॅफिकचा फटका

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे जाण्याच्या घोषणेनंतर नांदेडमधील मराठा बांधव सज्ज

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

SCROLL FOR NEXT