Children in America London are listening to Anu grandmother Story during lockdown 
पुणे

अमेरिका, लंडनमधली मुलं ऐकत आहेत अनु आजीच्या गोष्टी

ब्रिजमोहन पाटील

पुणे : "लहान मुलांना गोष्टी ऐकायला आवडतात, त्या आजोबा आजीने सांगितल्या तर, आणखी मजा येते. कोरोना लाॅकडाऊनमुळे मुले घरात अडकून पडलेली असताना अशा गोष्टी ऐकायला मिळाल्या तर मोठी पर्वणीच ठरते. पुण्यात रहाणाऱ्या अनु आजी मुलांसाठी मोबाईलवर रोज एक गोष्ट रेकॉर्ड करून त्यांना पाठवत आहेत. अमेरिका, लंडन, स्वित्झर्लंडसह अन्य ठिकाणी रहाणारे अनके मुले रोज या कथा ऐकत आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
अनुराधा गटणे या स्टेट बॅक ऑफ इंडियातून सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांची मुलगी वृषाली यांची दोन मुल शाळा सुटल्यावर त्यांच्याकडे यायच्या तेव्हा त्या मुलांना गोष्टी सांगत. लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर गटणे यांच्या नातावांचे घरी येणे बंद झाले. या मुलांना तर गोष्टी ऐकाव्या वाटायच्या, म्हणून त्यांनी व्हॉट्सअॅप वरून ऑडीओ क्लिप पाठवली. त्यांना या गोष्टी आवडल्या, त्यामुळे गटणे यांची दुसरी मुलगी स्वित्झर्लंड येथे असतात, त्यांनाही या रेकॉर्ड केलेल्या गोष्टी आवडल्या. "अनु आजी तु रोज आमच्यासाठी अशा गोष्टी पाठव" असा हट्ट नातवंडांनी धरला.

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा
गटणे यांच्या जवळची मंडळी कॅलिफोर्निया, लंडन येथे आहे, त्यांनाही हे कळाल्यावर ऑडीओ क्लिप पाठविण्याची मागणी केली. आजीच्या गोष्टींना चांगलाच प्रतिसाद मिळाल्याने "अनु आजीच्या गोष्टी" नावाचा व्हॉट्सअॅप गृप तयार केला. या गृपवर अडीचशे जण झाल्याने मर्यादा संपली आहे. त्यावरून त्या रोज एकदोन कथा रेकॉर्ड करून मुलांना पाठवतात. 


पुणेकरांनी फ्ल्यूची लक्षणं दिसल्यास काय करायचं? ही बातमी वाचा!
अनुराधा गटणे म्हणाल्या, "माझ्या नातांसाठी म्हणून ही रेकॉर्ड केले होते, पण एवढा मोठा प्रतिसाद मिळेल असे वाटले नाही. आता पुण्यासह कॅलिफोर्निया, लंडन, स्वित्झर्लंड, बेंगलोर, हैद्राबाद, दिल्ली येथील मुले मराठीतील गोष्टी मन लावून ऐकत आहेत. परदेशात रहाणाऱ्या मुलांना मराठीतून गोष्टी ऐकायला मिळत आहेत शिवाय त्यांचे भाषेचे ज्ञान वाढत आहेत. एखादा शब्द त्यांना कळाला नाही तर ते आई वडीलांना विचारत आहेत, हे महत्त्वाचे आहे."

Coronavirus : आयुर्वेद, होमिओपॅथीचा विचार व्हावा

"जी.ए. कुलकर्णी यांचे बखर बिम्मची यातील कथा, माधुरी पुरंदरे यांचे बालसाहित्य मुलांना आवडत आहेत. तसेच प्राणी, पक्षी, परी, जादू, शूर मुलांच्या गोष्टी या मुले मन लावून ऐकत आहेत. या उपक्रमामुळे मलाही आनंद मिळत आहे. तसेच संबंधित प्रकाशकांचीही परवानगी घेतली आहे, "असे गटणे यांनी सांगितले.

"आम्ही कॅलिफोर्नियामधे राहत आहोत. माझ्या मुलांशी घरी फक्त मराठीतच बोलण्याचा प्रयत्न करतो, पण मुलं थोड्या वेळातच इंग्रजीत उत्तरं देऊ लागतात. त्यांना मराठी भाषेची गोडी लागावी आणि ती टिकून रहावी म्हणून आम्ही सतत प्रयत्न करतो. कोरोना मुळे मार्च महिन्यापासून आम्ही घरीच आहोत. अनु आजींच्या गोष्टी मुलांना ऐकायला दिल्यानंतर त्यांनी मन लावून ऐकल्या. त्यांचा मराठी शब्दसंग्रह वाढत आहे. आताच्या नकारात्मक दिवसांत आम्हाला हा खाऊ दिल्याबद्दल अनु आजींचे आभार."
- रुपाली चव्हाण, कॅलिफोर्निया, अमेरिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT