सिंहगड रस्ता - स्वप्ना दातार यांच्याकडून बालदिनासाठी व्हायोलिनवर खास रचना शिकण्यातला आनंद या बालकांच्या चेहऱ्यावर अगदी झळकतोय ना! 
पुणे

व्हायोलिन वाजवून लुटणार आनंद (व्हिडिओ)

नीला शर्मा

पुणे - भारतीय बालकांसाठी आजचा (ता. १४) खास दिवस. हा बालदिन कसा साजरा करायचा, याच्या योजना बऱ्याच मुलांनी मित्र-मैत्रिणींबरोबर आखायला कधीच सुरवात केली होती. कुणी फिरायला जाणार, कुणी पुस्तक खरेदी करणार, तर काही मुलांनी आवडते खेळ खेळायचे ठरवले आहे, असे मुलांशी गप्पा मारताना लक्षात आले. एका गटाच्या मुलांनी मात्र स्वतः व्हायोलिन वाजवून बालदिनाचा आनंद लुटायचे ठरविले आहे.

तन्वी आणि आद्या म्हणाल्या, ‘बालदिनाला आम्ही व्हायोलिनवर एक मस्त ट्यून (गत) वाजवणार आहोत.

स्वप्ना दातारताईंकडे आम्ही व्हायोलिन शिकायला येतो. त्यांना आम्ही सांगितले की, स्पेशल काही तरी शिकवा. त्यांनी भूप रागातील एक रचना शिकवली. ती आम्ही सध्या बसवत आहोत. बालदिन साजरा करायची ही कल्पना आमच्या घरीसुद्धा सगळ्यांना आवडली आहे.’

अंतरा, पार्थ, मनस्विनी व श्रुती म्हणाल्या की, या बालदिनापासून पुढच्या वर्षीच्या बालदिनापर्यंत आम्हाला ताईंबरोबर कार्यक्रमांमध्ये वादन सादर करायला मिळावे, असा हट्ट करणार आहोत. तुलिका, तनिष्का, इरा आणि दिवीज म्हणाले, ‘आमच्यापैकी काही जण जास्त दिवसांपासून व्हायोलिन शिकत आहेत. ताईंनी शिकवलेले राग भूप, दुर्गा, काफी, बागेश्री, भीमपलास, खमाज, देस, यमन हे सगळेच आवडतात. पण, आताच्या बालदिनासाठी भूपमधली जी रचना त्या आमच्याकडून बसवून घेत आहेत, ती फार गोड आहे. संगीत शिकताना असा खाऊ मिळाला की धमाल वाटते. ही रचना आम्ही क्‍लासमध्ये सामूहिकपणे आणि घरी एकेकट्याने मनापासून वाजवणार आहोत.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेच्या हिताविरोधात काम! ६६ जागतिक संघटनामधून बाहेर पडण्याची ट्रम्प यांची घोषणा; भारताच्या नेतृत्वाखालील संस्थेचाही समावेश

Latest Maharashtra News Updates : तडीपार गुन्हेगार माजी आमदार अनिल भोसले प्रचारात

'मी कोणासारखी बनण्यासाठी इथं आले नाही' तापसी पन्नूने सांगितला तिच्या करिअरचा सुरुवातीचा काळ, म्हणाली...'मला वाईट गोष्टी...'

PM Kisan Scheme Update : पीएम किसानचे दोन हजार बंद होणार, पती-पत्नी दोघांनाही लाभ; बनावट शेतकऱ्यांची नावांची आली यादी

Vaibhav Suryavanshi : वैभवच्या नेतृत्वाखाली मालिका विजय मिळवला अन् आता भारताचा कर्णधार बदलला; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT