पुणे

दिवाळीसाठी बाजारात चिनी वस्तूंची चलती 

सकाळवृत्तसेवा

पुणे - दिवाळीच्या सणानिमित्त बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, लाइटच्या माळा आणि आकाशकंदिलांनी बाजारपेठा प्रकाशमय झाल्या आहेत. लाइटच्या माळांचे शेकडो प्रकार ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. मात्र, यामधील बहुतांशी लाइट माळा आणि आकाशकंदील हे चिनी आहेत. त्यामुळे या वर्षीच्या दिवाळीतही चिनी वस्तूंचा बोलबाला आहे. 

एलईडी, आरजीबी, धमाका अशा नवीन लाइट माळा या वर्षी नागरिकांचे विशेष आकर्षण आहेत. फुलांच्या आणि पणत्यांच्या आकारातील लाइट माळांनाही मागणी आहे. पन्नास रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंतच्या लाइट माळा बाजारात उपलब्ध आहेत. पारंपरिक आकाशकंदिलांबरोबरच चांदणी, घर, चक्र, अनेक फुलांचे आकार अशा विविध प्रकारांतील आकाशकंदील बाजारात उपलब्ध आहेत. या वर्षी "एमडीएफ पेपर'पासून तयार करण्यात आलेला आकाशकंदील बाजारातील वेगळेपण आहे. प्लॅस्टिक बंदीमुळे कापडी आणि कागदी आकाशकंदिलांनाही बाजारात मोठी मागणी आहे. 

दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने दुकानांमध्ये खरेदीसाठी येत असल्याचे चित्र सर्वत्र आहे. यामध्ये तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे. बाजारात आलेल्या नवीन वस्तू खरेदी करण्याकडे नागरिकांची ओढ असल्याचे दिसून येते. दिवाळीनिमित्त चिनी वस्तू बाजारात सर्वत्र दिसत आहेत. या वस्तूंशी स्पर्धा करण्यासाठी भारतीय वस्तू बाजारात दिसत नाहीत. विशेषत- लाइट माळा तर सर्वत्र चिनी बनावटीच्याच दिसतात. एकूणच बाजारात दिवाळीनिमित्त उत्सवाचे वातावरण आहे. 

विविध प्रकारच्या जवळ जवळ दीडशे लाइट माळा सध्या बाजारात उपलब्ध आहेत. त्यातील बहुतांशी चिनी आहेत. चिनी लाइट माळा स्वस्त असल्यामुळे नागरिकांचीही त्यांना पसंती असल्याने त्या विक्रीसाठी ठेवल्या आहेत. 
- कीर्ती शहा, दुकानदार 
 

प्लॅस्टिक बंदीमुळे या वर्षी पर्यावरणपूरक आकाशकंदील घेण्याला प्राधान्य दिले. दिवाळीला वेळ असला तरी घर सजविण्यासाठी लाइट माळा, आकाशकंदील आणि पणत्या खरेदी केल्या. 
- प्रीती नाईक, ग्राहक 

बाजारात स्वदेशी लाइट माळांची आवर्जून चौकशी केली, पण त्या मिळाल्या नाहीत. उपलब्ध असणाऱ्या माळा खिशाला परवडणाऱ्या नाहीत. त्यामुळे नाइलाजास्तव चिनी माळा खरेदी कराव्या लागल्या आहेत. 
- निखिल सावंत, ग्राहक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: शाहरुख खानचे दमदार अर्धशतक, गुजरातने पार केला 120 धावांचा टप्पा

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT