पुणे

'पाच-दहा नव्हे तर पुढील चाळीस-पन्नास वर्षे भाजपा हटत नाही'

जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनात चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य

कृष्णकांत कोबल

मांजरी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(pm narendra modi) जनसामान्यांना घर, स्वच्छतागृह, उज्वला गॅस जोड, बँक खाती, आरोग्यकार्ड, श्रमकार्ड आदी विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना विश्वास दिला आहे. त्यामुळे पाच-दहा नव्हे तर पुढील चाळीस-पन्नास वर्षे भाजपाची(bjp) सत्ता देशातून हटत नाही, असे कौतुक करीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(chandrkant patil ) यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार (mahavikas aghadi government) नाकर्ते असल्याची टीका केली.मांजरी बुद्रुक येथे भाजपाचे कार्यकर्ते अमित घुले यांनी दिलेल्या वैकुंठ रथाचे लोकार्पण व जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, उपाध्यक्ष राहुल शेवाळे, औसा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, नगरसेविका उज्वला जंगले, माजी नगरसेविका विजया वाडकर, शहर उपाध्यक्ष भूषण तुपे, गणेश घुले, जिल्हा सरचिटणीस संदीप लोणकर, मतदार संघाचे अध्यक्ष संदीप दळवी, महिला अध्यक्षा स्वाती कुरणे, अमर गव्हाणे, माजी सरपंच शिवराज घुले, जीवन जाधव, आण्णा धारवाडकर, तुषार घुले, प्रमोद कोद्रे, नितीन होले, प्रमोद सातव, स्मिता गायकवाड, वंदना कोद्रे, बबन जगताप, भारतीय किसान संघाचे माऊली घुले, आरपीआयचे गजेंद्र मोरे, सुमित घुले, समीर घुले, बाळासाहेब घुले आदी यावेळी उपस्थित होते.

माजी सरपंच शिवराज घुले, जीवन जाधव, आण्णा धारवाडकर, प्रमोद कोद्रे, नितीन होले, प्रमोद सातव, स्मिता गायकवाड, वंदना कोद्रे, माजी नगरसेविका विजया वाडकर, भारतीय किसान संघाचे माऊली घुले, सुमित घुले, समीर घुले, बाळासाहेब घुले, सामाजिक कार्यकर्ते तुषार घुले , सारिका घुले चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, "पंतप्रधान मोदींना माहिती आहे की सामान्य माणसाची गरज ही फक्त पोटाला अन्न नाही, तर त्याला हरिद्वार, काशी विश्वेश्वर, केदारनाथ, द्वारकेला जायचे आहे. तेच काम पंतप्रधान मोदी करीत आहेत.'माजी आमदार योगेश टिळेकर म्हणाले, "प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष करून अवघ्या पाच वर्षात मांजरीत उड्डाण पूल, पेयजल योजना, मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, स्ट्रीट लाईट अशी कामे केली आहेत.जगदीश मुळीक म्हणाले, "विकासाला पाठिंबा देणारा वर्ग मांजरी बुद्रुक मध्ये आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत याठिकाणी सर्वाधिक भाजपचे उमेदवार निवडून येतील.'शैलेंद्र बेल्हेकर यांनी सूत्रसंचालन केले तर, भूषण तुपे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जीवघेणा हल्ला, जनता दरबार सुरु असताना हल्लेखोर आला अन्...

Satara Rain update:'कराड-पाटण तालुक्यात मुसळधार; कराड-चिपळूण मार्ग वाहतूक बंद, अडकलेले कोकणात जाणारे 150 प्रवासी एसटी बसमधून रवाना

HDFC Bank Alert: HDFC ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बँकेच्या अत्यावश्यक सेवा दोन दिवस बंद राहणार

Dhanashree Verama: युझवेंद्र चहलच्या 'Sugar Daddy' टी शर्टवर धनश्रीची जोरदार टीका; म्हणाली, मी कोर्टात रडले आणि तो...

Pune Rain Update: पुण्यात पावसाचा हाहाकार! एकता नगरमध्ये पाणी शिरलं, खडकवासल्यातून विसर्ग वाढला

SCROLL FOR NEXT