Palghar_Lynching_Case 
पुणे

पालघर हत्याकांड प्रकरण: ‘सीआयडी’ने १२६ आरोपींविरुद्ध केलं दोषारोपपत्र दाखल!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पालघर जिल्ह्यात जमावाच्या हल्ल्यात दोन साधुंसह तिघांच्या खून प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) डहाणू येथील न्यायालयात १२६ आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या संवेदनशील प्रकरणाचा 'सीआयडी'ने वेळेत तपास पूर्ण करीत दोन वेगवेगळी दोषारोपपत्रे दाखल केली आहेत.

पालघरमधील डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथील वनविभागाच्या चौकीजवळ मुंबई येथून गुजरातकडे निघालेल्या दोन साधू आणि त्यांचा वाहनचालक अशा तिघांवर १६ एप्रिल रोजी गावात चोरटे शिरल्याच्या अफवेतून हल्ला झाला होता. आणि जमावाने लाठ्या-काठ्यांनी हल्ला करत त्यांना ठार केले होते. दरम्यान, राज्य शासनाच्या आदेशानुसार, या प्रकरणाचा तपास पालघर पोलिसांकडून काढून तो सीआयडीकडे देण्यात आला होता.

'सीआयडी'चे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. पथकाच्या प्रमुखपदी विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण साळुंके यांची नेमणूक करण्यात आली होती. सीआयडीच्या कोकण भवन कार्यालयातील पोलिस अधिक्षक मारुती जगताप, पोलिस अधिक्षक अजय देवरे आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. 

संबंधित पथकाने पालघर, डहाणू परिसरात फिरून आरोपींच्या घराची झडती, संशयितांची चौकशी, मारहाणीसाठी वापरलेली शस्त्रे जप्त केली. त्यानंतर ९० दिवसांच्या आत या संवेदनशील प्रकरणाचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. कासा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पहिल्या 
प्रकरणात तपास अधिकारी उपअधीक्षक विजय पवार यांनी तर दुसऱ्या गुन्ह्यात तपास अधिकारी इरफान शेख यांनी १२६ आरोपींविरुद्ध डहाणू येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rafale fighter jets India: आता शत्रूच्या उरात धडकी भरवणाऱ्या 'राफेल' लढाऊ विमानांची भारतात निर्मिती होणार!

Virar News : आंतरराष्ट्रीय किर्तीचे बॅलेनृत्य कलाकार नरेश नारायण उसनकर यांचे निधन

CM Devendra Fadnavis : सहकार्याची नवी दारे होणार खुली; महाराष्ट्र-अमेरिकेतील आयोवा राज्यामध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

Nashik News : शिवसेना (ठाकरे)-मनसेचा जनआक्रोश; नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर एकत्र मोर्चा

Disha Patani house firing अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार; ‘या’ गँगस्टरने घेतली हल्ल्याची जबाबदारी!

SCROLL FOR NEXT