cigarette 
पुणे

राईड दिली नाही म्हणून दिले सिगारेटचे चटके

सकाळवृत्तसेवा

पुणे - दुचाकीची राईड न दिल्याने 19 वर्षांच्या मुलाच्या कपाळावर सिगारेटचे चटके दिल्याचा प्रकार वडगाव बुद्रूक परिसरात घडला आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

योगेश देविदास कांबळे (वय 23) आणि आश्‍विन भोसले (रा. हिंगणे खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत सुहास अभिमन्यू वाघमारे (वय 19, रा. वडगाव बुद्रूक) यांनी तक्रार दिली आहे. वडगाव बुद्रूक येथील रोकडोबा मंदिराजवळ शुक्रवारी (ता.1) सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे अभ्यिमन्यू यांच्या ओळखीचे आहेत. घटनेच्या वेळी अभिमन्यू व त्यांचा मित्र योगेश निर्मळ हे स्पोर्ट बाईकवरून जात होते. त्यांना रोकडोबा मंदिराजवळ आरोपींनी आवाज देऊन बोलावून घेतले. त्याच्याजवळ असलेल्या बाईकची एक राईड मागितली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पण, अभिमन्यू यांनी राईड देण्यास नकार दिला. त्याचा कांबळे याला राग आला. त्याने अभिमन्यू यांना पकडले. त्यानंतर दोन्ही आरोपींनी अभिमन्यू यांच्या कपाळावर सिगारेटचे चटके दिले. त्यानंतर दोघे तेथून निघून आले. या बाबत अभिमन्यू सिंहगड रोड पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल केला. आरोपीचा माग काढत असताना कांबळे व भोसले या दोघांना अटक केली. आरोपी हे भाजी विक्रीचे काम करतात. कांबळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्याच्यावर खून व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अंकुश कर्चे करीत आहेत.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: आपल्यावर कुणी हात घालू शकतो त्याने विचार केला नव्हता, पण... पोलीस आयुक्त संदीप कर्णिकांनी सांगितला अटकेचा थरार

Latest Marathi News Live Update : कोल्हापूरमध्ये बिद्रीतील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान प्रकरण उघड

Beed News:मुलींनो एचपीव्ही लस घ्या; लसीमुळे तुम्हाला कोणताच धोका होणार नाही; अनेकांची पाठ; आकडे सांगताहेत भविष्यातील कर्करोगाची वाट; गैरसमज चुकीचा

Kolhapur Air Connectivity : कोल्हापुरातून मुंबई, अहमदाबाद व बंगळूरसाठी नवीन, सुधारित विमानसेवा सुरू; सोयीस्कर प्रवास होणार

Chhatrapati Sambhajinagar: रॉकेल मिळणार; पण ‘स्टोव्ह’ कुठून आणणार?; अनेक कुटुंबांचा प्रश्न ः एकच सिलिंडर असलेल्या गृहिणींपुढे अडचणींचा भडका

SCROLL FOR NEXT