Students 
पुणे

नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचं टेन्शन होणार कमी; 'सीआयएससीई'ने घेतलाय मोठा निर्णय!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (सीआयएससीई) शैक्षणिक वर्ष २०२०-२१ यासाठी इयत्ता नववी ते बारावीचा अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्षात अध्यापनासाठी कमी वेळ मिळणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा देणारा हा निर्णय आहे.  

सीआयएससीईच्या सचिवांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे सीआयएससीईशी संलग्न शाळांनी ऑनलाइन पद्धतीने अध्ययन-अध्यापनाची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, या शैक्षणिक वर्षात शैक्षणिक कामकाजाचा कालावधी कमी होणार आहे. त्यामुळे सीआयएससीईने विषय तज्ज्ञांची मदत घेऊन नववी ते बारावीच्या सर्व विषयांचा अभ्यासक्रम कमी केला आहे. अभ्यासक्रम कमी करताना विद्यार्थ्यांना संबंधित विषयातील मुलभूत संकल्पना कायम राहतील याची काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे या बदलानुसार अध्यापन करण्यात यावे. अशा पद्धतीने अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे. 

तसेच देशातील कोरोनाच्या संसर्गाची स्थिती पाहून गरज वाटल्यास अभ्यासक्रम आणखी कमी केला जाऊ शकतो, असेही सीआयएससीईने स्पष्ट केले आहे. या वर्षासाठी कमी करण्यात आलेला अभ्यासक्रम सीआयएससीईच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. अभ्यासक्रम कमी करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. हा निर्णय आणि कमी केलेल्या अभ्यासक्रम याबाबत अधिक माहितीसाठी www.cisce.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन 'सीआयएससीई'च्या वतीने करण्यात आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: पंतप्रधान आता नवीन स्वामी झालेत का? त्यांच्याकडे गद्दारांसाठी वेळ पण GenZ साठी नाही; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Mumbai Local: रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक, प्रवाशांचा खोळंबा होणार; वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचे आवाहन

Kolhapur House fire in Rui : डोळ्यादेखत घरं जळून खाक, हातात काहीच उरलं नाही; पण गावाच्या एका आवाहनाने लाखोंची मदत उभी राहिली

Latest Marathi News Live Update : पुण्यात आरक्षण उपवर्गीकरण विरोधात मोर्चा

Jharkhand Protest Reason : 38 प्रश्न सोडवले, तरी सरकारी नोकरी, झारखंडमधील स्कॅम काय?

SCROLL FOR NEXT