Citizen helps boy to Remove Car from Divider after Accident in pimpri 
पुणे

...अन् लोकांनी ती कार उचलून रस्त्यावर ठेवली

सकाळवृत्तसेवा

मोशी(पुणे): वेळ दुपारी एक ते दीडची...ठिकाण पुणे नाशिक महामार्गावरील कचरा डेपो समोरील महामार्ग...सुसाट वेगाने धावणारा मालट्रक आणि त्यापुढे व्यवसायिक कारणासाठी पुण्याकडे आपल्या मोटारीतून संथ वेगाने धावणारा चाकण मधील एक तरुण मोटारचालक. भरधाव वेगात येणार तो ट्रक कारला ओव्हरटेक करुन हूल देऊन  पुढे आला अन्.... होणारा अपघात टाळण्यासाठी चालकाने कार दुभाजकवर चढवली अन् तिथेच अडकली. पण त्यानंतर काही तरुणांनी माणुसकी दाखवत त्या कारचालकाची मदत केली. 

फुरसुंगीत बिबट्याचा थरार; गोठ्यातील वासरला फाडून खाल्ले
 

पुणे नाशिक महामार्गाने चाकणहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर चाकणमधील मुंगसे आडनावाचा तरुण आपल्या मोटारीतून योग्य वेगाने प्रवास करीत होता. मागून वेगाने येणार्‍या एका मालवाहतूक करणार्‍या मालट्रक चालकाने डाव्या बाजूने ओव्हरटेक करुन या मोटारकार चालकास जोरात रस्तादुभाजकाच्या बाजूला दाबत हूल दिली. आता आपला अपघात होतोय हे लक्षात येताच या तरुणाने या मालट्रक व अपघातापासून वाचण्यासाठी रस्ता दुभाजकावर मोटार चढविण्याचा निर्णय घेत क्षणात आपली मोटार दुभाजकावर चढवली व होणाऱ्या गंभीर अपघातापासून स्वतःला वाचविले. ट्रक चालकाने आरशात या तरुणाची झालेली परिस्थिती व वातावरण चिघळेल असे पाहून पळ काढला.

Video : पुण्यात फिरतेय महिला चोरट्यांची टोळी; ओढणीचा फास टाकून मारतेय डल्ला

मोटारकार चालकाने प्रसंगावधान पाहून मोटार दुभाजकावर चढवून स्वतःस वाचविले मात्र, त्याची मोटार त्या दुभाजकावर घट्ट अडकून पडल्याने त्याची मोठी पंचाईत झाली. मात्र, मागे हटेल ती तरुणाई कुठली. मागे येत असलेल्या काही तरुण दुचाकीस्वारांनी मात्र, लगेचच आपापल्या दुचाकी थांबवून या तरुणाला मदत करण्यासाठी माणुसकी या नात्याने त्यांनी त्याला मदतीचे हात पुढे केले.

पुणे-सोलापूर मार्गावर मेगाब्लॉक: 'या' चार गाड्या शनिवारी रद्द

काही तरुणांनी मागील वाहतूक काही काळ थांबवली तर त्यामधील काही ताकदवान तरुणांनी चक्क ही मोटार एका बाजूने उचलून रस्ता दुभाजकावर ठेवली तर काहींनी धावत पळत जाऊन काही मोठे दगड आणून टायर खाली ठेवले. क्षणात मिळालेली ही मदत पाहून काही क्षण घाबरलेल्या या तरुणाने मिळालेल्या मदतीचा फायदा घेत धाडस करून आपली मोटार कोणतेही नुकसान न होता दुभाजकामधून बाहेर काढली. अर्थात काही मात्र फोटो काढण्यात दंग होते. काही मिनिटांमध्ये घडलेल्या या प्रसंगातून तरुणाईमध्ये माणुसकीचा झरा खळखळून वाहत असलेल्या प्रत्यक्षदर्शी निदर्शनास आले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA 5th T20I: लखनौचा सामना 'धुक्यात' हरवला; आता भारत-दक्षिण आफ्रिका पाचवा सामना कधी व कुठे होणार, ते पाहा...

Nagpur News: डागा रुग्णालयात नवजात शिशूचा मृत्यू, नातेवाईकांचा गोंधळ, वैद्यकीय अधीक्षकांचे चौकशीचे आदेश

Viral Video: 'अरे पैसा नही चाहिये', रेल्वे स्टेनशवरील बाप-लेकीची गोड व्हिडिओ व्हायरल

पिंजऱ्यात शिकार, जंगलात राज! वाघीण 'तारा'ची सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दणक्यात एन्ट्री, शास्त्रीय पद्धतीने कशी राबवली 'सॉफ्ट रिलीज'?

Atal Bihari Vajpayee : राष्ट्रपतिपद स्वीकारण्यास वाजपेयींचा होता नकार; तत्कालीन माध्यम सल्लागार अशोक टंडन यांच्या पुस्तकात दावा

SCROLL FOR NEXT