Water-Supply 
पुणे

पुणे : अनियमित पाणी पुरवठ्यामुळे आंबेगावचे नागरिक त्रस्त

सकाळवृत्तसेवा

दत्तनगर, पुणे - आंबेगाव खुर्द प्रभाग क्र. ४२ अ मधील वाघजाईनगर, सह्याद्री सोसायटी मधील रहिवाशांचे पाण्यावाचून अतिशय हाल होत असून, आमचा पाणी प्रश्न महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत. 

प्रभाग क्र. ४२ अ मधील, वाघजाईनगर व सह्याद्री सोसायटीमध्ये पुणे महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाकडून ४ इंच व ६ इंच जलवाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. शिवाय या वाहिन्यासोबतच ८ इंच जलवाहिनीही पाणीपुरवठा विभागाकडून टाकण्यात आलेली आहे. अनुक्रमे ४ व ६ इंच असलेल्या जलवाहिन्यातून या परिसरात पाणीपुरवठा केला जातो आहे. त्यातील ६ इंच वाहिनीतुन, सत्ताधारी लोकप्रतिनिधींशी  लागेबंध असलेल्या नागरिकांनी अनधिकृतपणे अतिरिक्त नळजोड (कनेक्शन) केली आहे. शिवाय या अतिरिक्त नळजोडीला इलेक्ट्रिक मोटारी जोडून पाणी उपसले जाते आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मिळेल तितकेच कमी दाबाने येणारे पाणी भरावे लागत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुळातच या परिसरात पाणी पुरवठा हा दिवसाआड असून,त्याची निश्चित अशी वेळ नसल्याची तक्रारही नागरिक करत आहेत.आमच्या पाणी प्रश्नावर लवकर तोडगा काढावा अशी मागणी नागरिक करत आहेत.

'दोन तीन महिन्यापासून कमी दाबाने पाणी येत आहे. दिवसाआड येणाऱ्या पाण्यामुळे मनस्ताप होत असून उन्हाळ्याच्या तोंडावर पाणी प्रश्न उभा राहिला आहे. याचा त्रास होतो आहे.'
- रेखा शिंदे,रहीवाशी, वाघजाईनगर 

४ व ६ इंच असलेल्या जलवाहिन्या या ८ इंच जलवाहिनीला जोडल्या तर परिसरातील नागरिकांना प्रेशरने पाणी मिळू शकेल. प्रशासन आणि स्थानिक प्रतिनिधींचे या परिसराविषयी असणारे औदासीन्य गंभीर बाब आहे.'
- प्रसाद जगताप, सामाजिक कार्यकर्ते

'या बाबतीत आमच्या कनिष्ठ अभियंत्याना त्या भागातील अडचणी पाहण्याच्या सूचना देऊन, प्रश्न सोडवीला जाईल. 
- राजेश गुर्रम, उपअभियंता, स्वारगेट पाणीपुरवठा विभाग.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agriculture News : बळीराजा हवालदिल! दिवाळीनंतरही मुसळधार पाऊस, त्र्यंबकेश्वरमध्ये भातशेतीचे मोठे नुकसान, पीक खाचरात सडले

Asim Sarode: असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द; 'हे' वादग्रस्त विधान भोवलं

World Cup 2025: ...अन् हरमनप्रीत कौर कोच अमोल मुजूमदारला पाहताच पडली पाया; विश्वविजयानंतरचा भावूक करणारा क्षण

'तू वॅक्स केलय?' संजय दत्तसोबतच्या बेडरुम सीनवेळी सोनाली कुलकर्णींला हेअर स्टायलिस्टने विचारलेला विचित्र प्रश्न

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश्वरी मुंडे खासदार सुप्रिया सुळे यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT