bhor.jpg
bhor.jpg 
पुणे

कोरोना पेशंट म्हणतात, कोविड केअर सेंटर म्हणजे दुसरे घरच...

विजय जाधव

भोर (पुणे) : शहरातील मूक बधिर विद्यालयात सुरु करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमधील 
सोई-सुविधा या घराप्रमाणे मिळाल्यामुळे आम्हास घरातच राहिल्याचा अनुभव आला असल्याचे कोरोना रुग्णांनी सांगितले. कोरोनावर मात केल्यानंतर कोविड केअर सेंटरमधून घरी सोडताना काही महिला रुग्णांच्या डोळ्यात पाणी देखील आले. आमच्या घरातील लोकांइतकी काळजी प्रशासनाने घेतल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे व आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. तसेच प्रशासनास सहकार्य करणा-या व्यक्ती, संस्था व दानशूर व्यक्तींचेही रुग्णांनी आभार मानले.

शहरातील मूक-बधिर विद्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये स्वच्छ वातावरण, टिव्हीची सोय, उच्च दर्जाचे आणि वेळेवर मिळणारे चहा, नाष्टा व जेवण, पिण्यास व आंघोळीस गरम पाणी, सीसीटीव्हीची सोय, आरोग्य सेवेसाठी चोविस तास उपस्थित असलेले डॉक्टर, स्टाफ व कर्मचारी यामुळे आठ-दहा दिवसात आम्हांला कोणतीही उणीव भासली नाही. वेळोवेळी स्वच्छता करणारे कर्मचारी आणि त्यांचा नम्रपणा यामुळे आम्हास कचरा करताना अनेक वेळा विचार करावा लागला असल्याचेही रुग्णांनी सांगितले. 

काही रुग्णांनी कागदावर अभिप्रायदेखील लिहून दिले आहेत. कोरोनाग्रस्तांना दिल्या जाणा-या आरोग्य सेवेत प्रशासनातील प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, वैद्य़कीय अधिकारी यांच्यासमवेत शहरातील खासगी डॉक्टर्स, सेवाभावी संस्था व व्यक्ती, शिक्षक व इतर कर्मचा-यांचा समावेश आहे. मूक-बधिर विद्यालयातील कोविड सेंटरमध्ये सध्या कोरोनाचे ७२ रुग्ण आहेत. आयटीआय मधील सेंटरमध्ये १५ तर राजगड ज्ञानपीठाच्या वसतीगृहात १८ कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. याशिवाय वसतीगृहात स्वॅब तपासणीसाठी पाठविलेले २२ जणांनाही ठेवण्यात आले आहेत. याशिवाय २१७ जणांना त्यांच्याच घरांमध्ये 
क्वारंटाइन करण्यात आले आहे. 

तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची सद्यस्थिती
एकूण कोरोना पॉझिटीव्ह - ११९९
घरी सोडण्यात आलेले - ८१६
उपचार घेत असलेले - ३४४
मृत - ३९ 
एकूण स्वॅब तपासलेले - २१७८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export: कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी

IPL 2024 DC vs MI Live Score : मुंबईने जिंकली नाणेफेक! जाणून घ्या दोन्ही संघाची प्लेइंग ११

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींचा पुन्हा अपघात! हेलिकॉप्टरमध्ये जाताना पाय निसटला अन्..; पाहा व्हिडिओ

'श..श...शशांक...', KKR विरुद्ध विजयानंतर पंजाबच्या पठ्ठ्यानं शाहरुखच्या स्टाईलमध्ये ईडन गार्डन्सचे मानले आभार, पाहा Video

Bank Crisis: मोठ्या आर्थिक संकटाची सुरुवात? अमेरिकेत आणखी एक बँक दिवाळखोर; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT