Corona-Pune_Hospitals 
पुणे

काय सांगता! पुण्यातल्या हॉस्पिटल्समध्ये शिल्लक नाही एकही बेड!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यात महापालिका आणि खासगी हॉस्पिटल्समध्ये एकही बेड शिल्लक नसतानाच कोरोना रुग्णांची संख्या दीड हजाराच्या टप्प्यात गेली आहे. अशा गंभीर स्थितीत कोरोनाच्या मृतांचा आकडाही नऊशेच्या जवळपास गेला आहे. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे.

पुणेकरांना दिलासा मिळाला तो, साडेसातशेजण कोरोनामुक्त झाले त्याचा. दिवसभरात ६ हजार ३४३ जणांची तपासणी करण्यात आली. सध्या विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पाचशेहून अधिक रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. त्यातील ७६ जण व्हेंटिलेटरवर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढली आहे. परिणामी, हॉस्पिटलमध्ये बेड विशेषत :व्हेंटिलेटर, आयसीयू बेड मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होत आहे. त्यातच, बुधवारी पुन्हा १ हजार ४१६ नवे रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे पुणेकरांमध्ये भीती पसरली आहे. मृतांमध्ये दहा पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे. मृत व्यक्तींना कोरोनासोबत अन्यही आजार असल्याचे निष्पन्न झाले.

महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे म्हणाले,
"तपासणी वाढल्याने रुग्णांचा आकडा वाढत आहे. मात्र, नव्या रूग्णांमध्ये साधापरणे ६० टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत. त्यामुळे अशा बहुतांशी रुग्णांना घरी ठेवण्यात येत आहे. तर गरजेनुसार रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करीत आहोत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi: वैभववर BCCI चा मोठा विश्वास; गौतम गंभीरला मिळाल्या खास सूचना, संजू सॅमसनचे संघातील स्थान धोक्यात

Paithan Wari: पैठणहून संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान; गोदावरी काठी भाविकांची गर्दी

ATM Cash Shortage: एटीएममध्ये पैसे का नाहीत? अनेक शहरांमध्ये 'कॅश'चा तुटवडा; आरबीआयचं मोठं पाऊल

Latest Marathi News Update : पैठणहून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

Pune Mumbai Railway Route Close : मोठी बातमी! पुणे-मुंबई रेल्वे मार्ग बुधवारी देखील राहणार बंद; दिवसभरात १४ गाड्या रद्द

SCROLL FOR NEXT