Dr-Bhalchandra-Munagekar 
पुणे

नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करावा - डॉ. भालचंद्र मुणगेकर

सकाळ वृत्तसेवा

पुणे - नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) रद्द करणे देशाच्या हिताचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा कायदा रद्द करून योग्य भूमिका घ्यावी, असे आवाहन ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि काँग्रेसचे नेते डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी गुरुवारी केले. हा कायदा काँग्रेसने आणला असता तरी मी त्याला विरोधच केला असता, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

राजीव गांधी स्मारक समितीतर्फे आयोजित चर्चासत्रात ‘सीएए’बाबत डॉ. मुणगेकर यांनी आपली भूमिका मांडली. समितीचे प्रमुख गोपाळ तिवारी, राजीव जगताप उपस्थितीत होते. डॉ. मुणगेकर म्हणाले, ‘‘या कायद्याच्या अंमलबजावणीने देशांत गोंधळ निर्माण होणार आहे. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे याचे भान ठेवण्याची गरज आहे. मात्र तसे दिसत नाही. आर्थिक मंदी, अर्थव्यवस्थेची दुरवस्था, रोजगार निर्माण करण्यात आलेल्या अपयशामुळेच ‘सीएए’सारख्या विषयांकडे नागरिकांचे लक्ष वळविले जात आहे. देशाला मोठा इतिहास आणि परंपरा आहे. केवळ एकाच धर्मापुरता विचार करणाऱ्यांना जनता कधीच साथ देत नाहीत.’’ 

‘‘रोजगाराची स्थिती भयंकर आहे. तरुणांच्या हाताला काम नाही. औद्योगिक विकासदर वाढत नाही. मंदीची स्थिती हाताळून उद्योगाला चांगले दिवस आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची नितांत आवश्‍यकता आहे,’’ याकडेही डॉ. मुणगेकर यांनी लक्ष वेधले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: कर्जदारांना मोठा धक्का? ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये रेपो रेट वाढण्याची शक्यता; EMI किती वाढणार?

CM विजय यांनी नवजात बाळांना दिली सोन्याची अंगठी; भाजपने टीका करत म्हटलं, मुलांना दुधाची जास्त गरज

Thane News: ठाण्यात शिंदेंच्या कार्यकर्त्याला महिलांनी धु-धू धुतला, पोलिसांसमोर घडला प्रकार; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : ‘सीओईपी’च्या चिखली कॅम्पसमध्ये उभाणार ‘स्वदेशी बॅटरी तंत्रज्ञान केंद्र’

Heart Attack Prevention : वयाच्या तिशीतच का येतोय हार्ट अटॅक? तरुणांमध्ये वाढतोय हृदयविकाराचा धोका; 'या' सवयी तातडीने बदला नाहीतर...

SCROLL FOR NEXT