१६००  टन शहराची  हद्द २५०  चौरस किलोमीटर सफाई कामगार  ६,३०० पडीक जागा  ३१०
१६०० टन शहराची हद्द २५० चौरस किलोमीटर सफाई कामगार ६,३०० पडीक जागा ३१०  
पुणे

पुणेकरांनी केलेला कचरा साफ करण्यासाठीचं कोट्यवधींचं बजेट!

ज्ञानेश सावंत

पुणे - पुणेकर कुठेही कचरा टाकतात म्हणूनच जागोजागी प्रचंड कचरा आहे, असे चित्र रंगवून महापालिकेने मोकळ्या जागेवरील (पडीक) झाडणकामासाठी अर्थात कचरा साफ करण्यासाठी सव्वापाच कोटी रुपये मोजण्याचे ठरवले आहे.

या कामांसाठी शुक्रवारी वादग्रस्त निविदा काढली असून, अशा प्रकारे १५ क्षेत्रीय कार्यालयांकडून किमान ७५ ते ८० कोटी रुपयांच्या निविदा मागविल्या जाण्याची शक्‍यता आहे.

मुळात, साफसफाईसाठी महापालिकेकडे सुमारे साडेसहा हजार कामगार असूनही झाडूकामासाठी वेगळ्या निविदेची गरज काय, असा प्रश्‍न आहे. दुसरीकडे, प्रभागांत कचरा नसल्याने महागड्या निविदा कोणासाठी काढल्या, अशी विचारणा करीत निविदेत गौडबंगाल असल्याकडे नगरसेवकांनी लक्ष वेधले आहे.  

एवढ्या रकमेतून केवळ तीन प्रभागांतील कचरा उचलण्यात येणार आहे, तोही मोकळ्या जागांवरचा. आता मुळात प्रचंड विस्तारलेल्या शहरात किती मोकळ्या जागा आहेत ? याची माहिती ही निविदा काढलेल्या अधिकाऱ्याला नाही. तरीही अशा जागांवरील कचरा पुढील वर्षभर उचलण्याची गरज या घनकचरा विभागाला वाटते आहे. पडीक जागांवरील झाडणकामाच्या नावाखाली महापालिकेतील अधिकारी वर्षानुवर्षे अशाच प्रकारे कोट्यवधी रुपये कचऱ्यात घालत असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट आहे. 

झाडणकाम म्हणजे कय ? 
शहरात खासगी आणि सरकारी मालकीच्या मोकळ्या जागा आहेत. त्यातील बहुतांशी जागा बंदिस्त आहेत. त्यामुळे त्याठिकाणी नियमित साफसफाई करणे शक्‍य होत नाही. त्यामुळे या जागांवर कचरा साचतो. तो उचलला जात नाही, त्यामुळे परिसरातील रहिवाशांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्‍वभूमीवर मोकळ्या जागांच्या झाडूकामासाठी ठेकेदार नेमून, त्यांच्या माध्यमातून स्वच्छता राखणे अशी ‘झाडणकाम’ची व्याख्या निश्‍चित केली आहे.

या कामासाठी सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाने केवळ तीन प्रभागांसाठी ५ कोटी २३ लाख रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या भीतीपोटी काही नगरसेवकांनी या निविदा काढण्यास भाग पाडल्याचे अधिकाऱ्यांनी खासगीत सांगितले. मात्र, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी-कर्मचारी कामे करीत नाहीत. त्यामुळे कचरा साठतो आहे, अशी तक्रार नगरसेवकांची आहे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी काढलेली ही निविदा पाहता, केवळ ठेकेदारांचे भले होईल, अशी व्यवस्था केली आहे.        

अधिकाऱ्यांकडे नाही उत्तर
संपूर्ण शहरात झाडणकामांची गरज असल्याचे सांगण्यात येते. तेव्हा एका क्षेत्रीय कार्यालयासाठी सव्वापाच कोटींची निविदा असेल तर अन्य १४ क्षेत्रीय कार्यालयांकडून एवढ्याच रकमेच्या निविदा काढल्या जाण्याची शक्‍यता आहे. तसे झाल्यास झाडणकामासाठी तब्बल ७५ ते ८० कोटी रुपयांच्या निविदा काढून त्या मंजूर होण्याचा अंदाज आहे. महापालिकेतील मूळ खात्याकडे विचारणा केली, तर ही निविदा क्षेत्रीय कार्यालयाची असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वत:ची सुटका करून घेतली.

रोजचा कचरा १६०० टन
शहराची  हद्द २५० चौरस किलोमीटर
सफाई कामगार ६,३००
पडीक जागा ३१० 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT