The climber will now help to fight against Corona 
पुणे

Fight Against Corona :आता गिर्यारोहक करणार कोरोना विरोधात चढाई 

सकाळन्यूजनेटवर्क

पुणे : एरवी डोंगर दर्ऱ्यांमध्ये भटकंती करणारे गिर्यारोहक आता मेडिकल केअर पासून ते धान्य वाटपासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. महापालिका प्रशासनापासून ते पोलिस यांच्या खाद्यांला खांदा लावून कोरोना बाधित क्षेत्रात काम करण्याची तयारी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघाने दर्शविली आहे. पहिल्या टप्प्यात महापालिकेकडून भवानी पेठ आणि ढोलेपाटील क्षेत्रीय कार्यालयांतर्गत परिसरात त्यांची नेमणूक आली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे शहरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या विषाणूला रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. या कामासाठी प्रशासनाला अपुऱ्या मनुष्यबळालाही तोंड द्यावे लागत आहे. शहरातील अनेक स्वयंसेवी संस्था आपापल्या परीने मदतीचे कार्य करीत आहेत. राज्य सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन राज्यातील गिर्यारोहक संघटनेने प्रशासनाच्या मदतीला धावून जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महासंघाने अशा परिस्थिती मदतीच्या कामाला येऊ शकणाऱ्या सभासदांना आवाहन केले होते. त्यानुसार राज्यातून सुमारे एक हजार 500 हून अधिक सभासदांनी काम करण्याची तयारी दर्शविली आहे. त्या सर्व सभासदांची यादी तयार करून महासंघाच्या वतीने त्या त्या भागातील महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठविली होती. 

रेशनकार्डाच्या नियमात केंद्राकडून बदल; तब्बल एवढ्या लोकांना होणार फायदा

पुणे शहरात सभासदांची यादी महापालिका आयुक्तांकडे पाठविली होती. त्यावर महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी महासंघाच्या सभासदांची काल बैठक घेतली. सुमारे चारशे सभासदांनी काम करण्याची तयारी दर्शविली आहे. आजपासून त्यांच्या सेवा कार्याला सुरवात झाली.

मोठी बातमी : रांगेत न थांबता दारू मिळणार; पुण्यात ई-टोकनला सुरवात!

 यासंदर्भात महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे म्हणाले,"" भवानी पेठ आणि ढोलेपाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये महापालिकेकडून शिधा वाटपाचे काम सुरू करण्यात आले आहे. ते वाटप करण्यासाठी आम्हाला सांगण्यात आले आहे. याशिवाय मेडिकल केअर, पोलिसांना मदत , शहरातील ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधा आदी क्षेत्रातही मदत देण्याची तयारी महासंघाच्या वतीने दर्शविण्यात आली आहे.'' 

बाप रे ! पुण्याने ओलांडला कोरोनाग्रस्तांचा तीन हजारांचा टप्पा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran War Victory : अमेरिकेने युद्ध जिंकल्याचा ट्रम्प यांचा दावा, म्हणाले- इराणने आम्हाला मोठं गिफ्ट पाठवलं

Hotel Close Ratnagiri : रत्नागिरीत २५० हॉटेलचे ‘शटर बंद’, शिवभोजन थाळीही बंद सर्वसामान्यांची फरफट

Latest Marathi News Live Update : 'आप'चे आमदार पठाणमाजरा यांना ग्वाल्हेरमधून अटक

IPL 2026: मुंबईत सर्व IPL कर्णधारांची बैठक; इम्पॅक्ट खेळाडू, आचारसंहिता आणि नवीन नियमांची चर्चा होणार

'पुष्पा 2 मध्ये काम केल्याचा मला पश्चाताप' प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली...'मला ते पाहून धक्काच बसला...'

SCROLL FOR NEXT