Corona 3rd wave Google file photo
पुणे

लहान मुलांसाठी तापाचे दवाखाने सुरु करावेत; टास्क फोर्सची सूचना

कोरोनासाठी पायाभूत सुविधांवर भर; विशेष कार्यदलाचे डॉ. प्रमोद जोग यांची माहिती

सम्राट कदम

पुणे : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा वाढवाव्या लागतील. बाधित मुलांच्या उपचारासाठी तापाचे दवाखाने सुरू करण्यात यावेत. ज्यामध्ये सामान्य आजारांसह, कोरोनाची सौम्य आणि तीव्र लक्षणे असणाऱ्या मुलांचे वर्गीकरण करता येईल. असा ठिकाणी आवश्यक आरोग्य सुविधाही उपलब्ध असाव्यात, अशी माहिती राज्य सरकारने स्थापन केलेल्या बालरोग तज्ज्ञांच्या विशेष कार्यदलाचे (टास्क फोर्स) सदस्य डॉ. प्रमोद जोग यांनी दिली.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्गाचा धोका जास्त असल्याचे बोलले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी १४ बालरोग तज्ञांचे विशेष कार्यदल स्थापन करण्यात आले आहे. कार्यदलाच्या येत्या काळातील कार्यवाही, लहान मुलांवरील उपचार आणि कोरोना प्रतिबंधक उपयासंबंधात डॉ. जोग यांच्याशी ‘सकाळ’ने संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत ज्येष्ठांपेक्षा तरुणांमध्ये जास्त संसर्ग झाला. तसेच, लहानग्यांसाठी अजूनही कोरोनाची लस उपलब्ध नाही. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेत त्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, असे डॉ. जोग म्हणाले.

लहानग्यांतील पाच धोक्याची लक्षणे ः

१) श्वासाचा वेग वाढणे

२) शरीरातील ऑक्सिजनची पातळी ९५ टक्क्यांपेक्षा खाली येणे

३) पाच पेक्षा जास्त दिवस ताप

४) लहानग्यांमधील सुस्त व मलूलपना

५) अन्नपाणी कमी होणे

डॉ. जोग म्हणाले...

- कोरोनाबाधित लहानग्यांपैकी जवळजवळ ९० टक्के मुलांना सौम्य लक्षणे असतात. ज्यामध्ये मुलांना खोकला आणि ताप असू शकतो. तर ५ टक्के मुलांना मध्यम स्वरूपाची लक्षणे असतात. त्यामध्ये त्यांचा श्वासोच्छ्वास मोठ्या प्रमाणावर वाढतो. उरलेले ५ टक्के मुलांना ऑक्सिजनची गरज पडू शकते.

- तापाच्या दवाखान्यांमध्ये कोरोना नसलेले, कोरोना सदृश आजार असलेले आणि कोरोना असलेले असे मुलांमध्ये वर्गीकरण करण्यात येईल. कोरोनाचे सौम्य लक्षणे असलेल्या मुलांवर घरीच उपचार करता येतील पण ज्यांना हॉस्पिटलायझेशनची गरज आहे. त्यांच्यासाठी ऑक्सिजन, औषधे आदी पायाभूत सुविधा केंद्रावर असाव्यात.

- ग्रामीण रुग्णालयांमध्ये होल्डिंग युनिट असावेत. जेथे मुलांना काही काळ पुढची व्यवस्था होईपर्यंत उपचार करता येतील. तसेच, रोजचा ताप आणि ऑक्सिजन मोजण्यासाठी पल्स ऑक्सिमिटरसारख्या सुविधा ग्रामिण भागात द्यायला हव्यात. तसेच मुलासोबत थांबण्यासाठी एका पालकाची व्यवस्था असावी.

- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांना प्रशिक्षण देण्यात यावे. त्यासाठीचे मॉड्यूलही आम्ही विकसित करत आहोत. लहान मुलांना हाताळण्याच्या दृष्टीने ते गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde PA case: पंकजा मुंडेंचे PA यांच्या पत्नीचा रहस्यमय मृत्यू; कुटुंबाचा हत्येचा आरोप… नेमकं काय घडलं?

CM Yogi Adityanath: योगींनी प्रयागराजमध्ये केले गंगा पूजन व हनुमानजींचे दर्शन; माघ मेळ्यासाठी मागितला आशीर्वाद

Hinjewadi Accident : मारुंजी अपघात; मिक्सर चालकासह प्लँट मालकालाही अटक, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदानाआधीच भाजपचा दबदबा; १०० उमेदवारांची बिनविरोध निवड

Pune RTO : नवले पूल अपघातानंतर आरटीओ ॲक्शन मोडवर! २० चालकांच्या डोळ्यांत दोष, कायमस्वरूपी तपासणी केंद्राची मागणी

SCROLL FOR NEXT