Cloudy weather in Pune sakal
पुणे

Cloudy Weather : पुणे : शहरात ढगाळ हवामानाची शक्यता

उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या अंदाजामुळे पुणे शहरातही शनिवारी (ता.४) आणि रविवारी (ता.५) शहरात दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या अंदाजामुळे पुणे शहरातही शनिवारी (ता.४) आणि रविवारी (ता.५) शहरात दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे कमाल तापमानत घट होण्याची शक्यता आहे.

शहरात उन्हाळा हंगामाला सुरुवात झाल्याने कमाल तापमानात सातत्याने वाढ होऊन उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहेत. शुक्रवारी शहरातील सरासरी कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले, तर किमान तापमानही १५ अंशाच्या वर नोंदविले गेले. कमाल आणि किमान तापमानातील हा फरक आता कमी होत असून, ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात एक-दोन अंशाची घट होण्यची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

राज्याच्या किमान तापमानात चांगलीच वाढ झाल्याने गारठा कमी झाला आहे. शुक्रवारी राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी किमान तापमानाचा पारा १२ अंशांच्या पुढे होता. यातच शनिवारपासून (ता. ४) उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता आहे. आज उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहून विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. उद्यापासून राज्याच्या विविध भागात वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT