vasant more mns 
पुणे

मुख्यमंत्र्यांचा वसंत मोरेंना फोन... शिवसेनेची 'ऑफर'

सकाळ डिजिटल टीम

राज ठाकरे यांनी मशिदींच्या भोंग्यांविरोधात पुकारलेल्या भूमिकेबद्दल पक्षांतर्गत काही जणांनी नाराजी व्यक्त केली. यामध्ये पुण्याचे मनसे शहरप्रमुख वसंत मोरे आघाडीवर होते. रमजान सुरू असल्याने मुस्लीम बांधवांविरोधात कोणतंही पाऊल उचलणार नाही, असं मोरे म्हणाले. यानंतर पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली. शहराध्यक्ष पदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. यानंतर साईनाथ बाबर यांच्याकडे पुण्याची सूत्र देण्यात आली आहेत. (CM Uddhav Thackeray Calls Vasant More)

मोरे यांनी आपल्या पक्षात यावं यासाठी अनेक पक्षांचे नेते त्यांच्या संपर्कात असल्याचं खुद्द मोरे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता वसंत मोरेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन केल्याचं समोर आलंय. याआधी पुण्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनीही मनसेतील नाराज नेते आणि कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षात यावं, असं म्हटलं होतं.

गुढीपाडवा मेळाव्यात शिवतीर्थावरील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून मुस्लीम बांधवांमध्ये नाराजी असल्याचं समोर आलंय. पुण्यात याआधी तीन पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. पक्षांतर्गत खदखदही सुरू आहे.

वसंत मोरे यांची हकालपट्टी झाल्यापासून ते कोणत्या पक्षात जाणार, याची चर्चा सुरू होती. त्यांनी सर्व पक्षांतील बड्या नेत्यांचे फोन आल्याचं खुद्द मोरेंनींच सांगितलं होतं. पुण्यात मनपा निवडणुकीआधी हे नाराजीनाट्य रंगल्याने मनसेला मोठा फटका बसणार असल्याचं चित्र आहे.

पुण्यात वातावरण तापलं, राज ठाकरेंच्या नावाला फासलं काळं

पुण्याच्या कोंढव्यातील नुरानी कब्रस्तानचा भूमिपूजनाचा कार्यक्रम राज ठाकरे यांच्या हस्ते झाला होता. राज ठाकरे यांच्या नावाला काळा रंग लावून स्थानिक लोकांनी त्यांचा निषेध दर्शवला.

या बांधवांच्या भावना दुखावल्याने पुण्यात याधीच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. तर दुसरीकडे पुण्यात मनसेने पोलीस आयुक्तांना पत्र लिहून चार दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. चार दिवसात भोंगे न काढल्यास पुण्यात दुप्पट भोंगे लवून हनुमान चालिसा म्हणणार असल्याचं स्पष्ट केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचे सरकार डळमळीत?, फुटण्यासाठी एका आमदाराला ३५ कोटींची ऑफर, तिघांना अटक

LPG Price Today: कमर्शियल LPG सिलेंडर 183 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता घरगुती गॅसचे दर जाहीर! पाहा तुमच्या शहरातील नवे भाव

Belgium vs Senegal : ३ मिनिटांत बाजी पलटली, बेल्जियमने ०-२ अशा पिछाडीवरून मॅच फिरवली; लढवय्या सेनेगलचा दुर्दैवी पराभव

Latest Marathi News Live Update : एल्फिन्स्टन ब्रिज परिसर जलमय, सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

SCROLL FOR NEXT