Uddhav-and-narendra 
पुणे

सत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाच होणार नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे भेट; पण कुठं?

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पोलिस महासंचालक परिषदेला (डीजी कॉन्फरन्स) शुक्रवारपासून पाषाण येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (आयसर) संस्थेमध्ये होत आहे. या तीन दिवसीय परिषदेचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी होणार आहे. तर पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोहगाव विमानतळावर येणार आहेत, त्यानंतर ते तत्काळ मुंबईला रवाना होणार आहे.

महाराष्ट्रातील मोठ्या सत्तासंघर्षानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले. त्यानंतर मोदी-ठाकरेंची पहिल्यांदाच भेट होणार असल्याने त्याबाबत उत्सुकता आहे. 

कोणा कोणाची उपस्थिती? 
देशातील सर्व राज्यांचे, विविध विभाग, तपास यंत्रणांचे पोलिस महासंचालक, प्रमुखांची देशपातळीवरील "डीजी कॉन्फरन्स' पहिल्यांदाच पुण्यात होत आहे. त्यासाठी गुप्तचर विभागाच्या (आयबी) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही दिवसांपासून पुण्यात तळ ठोकला आहे. त्यांच्या सुक्ष्म देखरेखीखाली ही तीन दिवसीय परिषद संपन्न होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह तपास यंत्रणांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या परिषदेसाठी पोलिस महासंचालक, सर्व तपास यंत्रणा, गुप्तचर यंत्रणांसह पोलिस प्रशासनाच्या विविध विभागांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये देशातील अंतर्गत सुरक्षिततेबाबत चर्चा केली जाणार आहे.

महाराष्ट्रातील राजशिष्टाचार
पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येत असल्याने व राजशिष्टाचाराचा भाग म्हणून मुख्यमंत्री ठाकरे हे लोहगाव विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी येणार आहेत. मुख्यमंत्री ठाकरे उद्या (शुकवार, 6 डिसेंबर) रात्री नऊ वाजता विमानतळावर दाखल होणार आहेत. पण, उद्धव ठाकरे यांचा नियोजित कार्यक्रम काय आहे? ते या सोहळ्या का उपस्थित राहू शकणार नाहीत, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. बिहारमध्ये भाजप आणि संयुक्त जनता दलामध्ये दुरावा आल्यानंतर नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत व्यासपीठावर येणं टाळलं होतं. त्यांनी राजशिष्टाचाराचा भंग केला होता. महाराष्ट्रात मतभेद असले तरी, ते शिष्टाचाराच्या आड येत नाहीत, असे पुन्हा सिद्ध होताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT