cng-fuel
cng-fuel 
पुणे

इंधनबचतीसाठी ‘सीएनजी’चा वापर वाढण्याची गरज - शेखर इनामदार

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस’वर (सीएनजी) चालणाऱ्या वाहनांमुळे इंधनबचत होण्यासोबत प्रदूषणालाही आळा बसतो. इलेक्‍ट्रिक वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणापेक्षाही ‘सीएनजी’ वाहनांचे प्रदूषण खूप कमी असते. त्यामुळे ‘सीएनजी’वर चालणाऱ्या वाहनांचा अधिकाधिक वापर व्हावा, असे मत वाहतूक क्षेत्रातील अभ्यासक शेखर इनामदार यांनी व्यक्त केले.

मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शेखर इनामदार यांचे ‘इंधनबदलामुळे प्रदूषणनियंत्रण’ या विषयावर व्याख्यान झाले. ते म्हणाले, ‘‘शहरात २००६ पासून सीएनजी वाहनांचा वापर सुरू झाला. शहरात ‘सीएनजी’ पंपांची संख्या ५० असून, आणखी २० नवीन पंप सुरू होणार आहेत. नागरिकांनी ‘सीएनजी’ वाहनांचा वापर जास्तीत जास्त करावा.’’ या व्याख्यानाला मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ, कार्यकारिणी सभासद वसंत शिंदे, दीपाली अकोलकर, विनय र. र., कार्यवाह संजय मा. क. आदी उपस्थित होते. प्रास्ताविक विनय र. र. यांनी केले. सूत्रसंचालन दीपाली अकोलकर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT