अमित शहा 
पुणे

पुण्यात सहकार विद्यापीठ स्थापन करावे

केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे सहकार परिषदेचे अध्यक्ष अनास्कर यांचा प्रस्ताव

उज्वलकुमार

पुणे : सहकाराची पंढरी असलेल्या महाराष्ट्रात त्यातही शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये सहकार विद्यापीठ व्हावे, असा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) विद्याधर अनास्कर यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना पाठविला आहे.

दिल्ली येथे २५ सप्टेंबर रोजी देशातील पहिले राष्ट्रीय सहकार संमेलन शनिवारी (ता. २५) पार पडले. या राष्ट्रीय सहकार परिषदेमध्ये केंद्रीय सहकार मंत्री शहा यांनी देशामध्ये सहकार विद्यापीठ स्थापण्याची महत्वाची घोषणा केली आहे. या घोषणेचे राज्यातील सहकार क्षेत्राकडून स्वागत होत आहे. हे सहकार विद्यापीठ सहकाराची पंढरी असलेल्या महाराष्ट्रात त्यातही शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात व्हावे, असा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष अनास्कर यांनी केंद्रीय सहकार मंत्री शहा यांना पाठविला आहे. सहकार विद्यापीठ लवकरात लवकर सुरु व्हावे, यासाठी सध्याचे वैकुंठभाई मेहता सहकार प्रबोधिनीचे रुपांतर सहकार विद्यापीठामध्ये करण्याचा पर्यायसुद्धा सुचविला आहे.

यापूर्वी देशातील पहिले सहकार विद्यापीठ महाराष्ट्रात सुरु करण्याचा प्रथम प्रस्ताव अनास्कर यांनी २०१४ मध्ये राज्य सरकारकडे दिला होता. नंतर पुनश्च २०१७ मध्ये तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या शिफारशीने तो राज्य सरकारकडे पाठविला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो तत्वतः मान्यही केला होता. राज्य सहकारी बँकेने त्यासाठी पुढाकार घेत भू-विकास बँकेची येथील मार्केटयार्ड परिसरातील जागा २५ कोटींना विकतही घेतली होती. परंतु दुर्दैवाने संबंधित प्रकरण पुढे मुंबई उच्च न्यायालयात गेल्यामुळे सहकार विद्यापीठाची संकल्पना मूर्त स्वरुपात येऊ शकली नाही.

केंद्रीय मंत्री शहा यांच्या सहकार विद्यापीठाच्या घोषणेनंतर सहकार विद्यापीठ पुण्यात होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठालगत असलेल्या वैकुंठभाई मेहता सहकार प्रबोधिनी येथे सहकार विद्यापीठासाठी आवश्यक पुरेशी जागा, पायाभूत सुविधा उपलब्ध आहे. पुण्यात सहकार विद्यापीठ झाल्यास महाराष्ट्र आणि देशातील सहकार क्षेत्राला बळकटी मिळेल.

- विद्याधर अनास्कर, अध्यक्ष- महाराष्ट्र राज्य सहकार परिषद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK : शफाली वर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! पाकिस्तानला पहिल्याच चेंडूवर जागा दाखवली; जगात भारी कामगिरी केली Video Viral

DCM Sunetra Pawar : हजार शाळा ‘मॉडेल स्कूल’बनविणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

India China Strategy: चीनच्या तुलनेत भारताची तंत्रज्ञान क्षमता वाढविण्याची गरज; ‘चायना कॉन्फरन्स २०२६’मध्ये तज्ज्ञांचा सूर

Sangramdurg Ground Fort : ‘संग्रामदुर्ग’चा दोनशे वर्षांपूर्वीचा नकाशा पुरातत्त्व विभागाकडे मिळाला

Narendra Modi: मोदींचा राहुल गांधींवर हल्ला! म्हणाले, त्यांचा एकच पेटंट डायलॉग असतो.. 'याची काय गरज होती?'

SCROLL FOR NEXT