cocine
cocine 
पुणे

पुण्यात 88 लाखांचे कोकेन जप्त

सकाळ वृत्तसेवा

पुणे  शहरातील उच्चभ्रू वस्तीमध्ये कोकेन पुरवठा करणाऱ्या एका नायजेरीयनला अटक करून त्याच्याकडून तब्बल 88 लाख रुपयांचे 733 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. पोलिसांनी एका महिन्याच्या आत दुसरी मोठी कारवाई केली आहे.

शोलोडॉये सॅम्युअल जॉय (वय 44, रा. रावत कॅप्सस्टोन सोसायटी, उंड्री) याला अटक केली आहे. जॉय हा नायजेरीयन असून, त्याचा कपड्यांचा व्यापार असल्याचे सांगून तो बिझनेस व्हीसावर फेब्रुवारी महिन्यात पुण्यात आला आहे. काही काळ तो मुंबईतही राहिला आहे. तो त्याच्या फ्लॅटमध्ये कोकेनच्या छोट्या पुड्या तयार करून त्या उच्चभ्रू वस्तीवस्ती नशेखोरांना विकत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक विजय टेकाळे यांचे पथक तयार करण्यात आले. त्यांच्या पथकातील अविनाश शिंदे, राहूल जोशी, महेंद्र पवार, प्रफुल्ल साबळे, मनोज साळुंखे, अमित छडीदार योगेश मोहिते यांनी जॉयच्या फ्लॅटवर छापा मारून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 87 लाक 96 हजार रुपयांचे 733 ग्रॅम कोकेन, 3.68 लाख रोख रक्कम, पाच मोबाईल, तीन घड्याळ, वजन काटा व प्लास्टिकच्या पिशव्या असा एकूण 91 लाख 79 हजार 70 रुपयांचा ऐवज जप्त केला, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT