Cold-fever-patient sakal
पुणे

Pune News : पुण्यात थंडी-तापाचे रुग्ण वाढले

बदलत्या वातावरणामुळे शहरात कीटकजन्य आणि जलजन्य आजारांचे रुग्ण वाढले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पावसाच्या अधून-मधून पडणाऱ्या सरी, ढगाळ वातावरण आणि मधूनच लागणारा उन्हाचा चटका, अशा विषम वातावरणामुळे शहरात थंडी, तापाच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले. डोळ्यांची साथ सुरू असतानाच सर्दी, खोकल्याचीही यात भर पडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बदलत्या वातावरणामुळे शहरात कीटकजन्य आणि जलजन्य आजारांचे रुग्ण वाढले आहेत. शहरात गेल्या महिन्याभरापूर्वा सर्दी, ताप, खोकला, थंडी वाजणे, डोकेदुखी अशा तक्रारी घेऊन दवाखान्यात दरदिवसाला १५० ते २०० रुग्ण येत होते. ही संख्या आता जवळपास दुपटीने वाढली आहे. त्यामुळे सकाळी लवकर दवाखाना सुरू करून रात्री उशिरापर्यंत रुग्णसेवा करावी लागत असल्याची माहिती डॉ. दत्तात्रेय कदम यांनी दिली.

लहान मुलांचे नियमित लसीकरण करू घेणे आवश्यक आहे. त्यानंतर काही मुलांना ताप येतो; पण तो ताप ही लसीकरणाची ‘रिॲक्शन’ असते. त्यामुळे पालकांनी घाबरून न जाता, डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे औषधोपचार द्यावे. गेल्या काही दिवसांपासून ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांचे प्रमाण वाढले असले, तरीही बहुतांश सर्व रुग्णांना बाह्यरुग्ण विभागात उपचार केला जात आहे. त्यापैकी अत्यल्प रुग्णांना उपचारासाठी दाखल करावे लागते.

- डॉ. सचिन गांधी, वैद्यकीय तज्ज्ञ

सर्वाधिक त्रास कोणाला?

लहान मुले आणि १५ ते २४ वर्षे वयोगटाच्या मुला-मुलींमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण जास्त असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सागर माने यांनी नोंदविले. ते म्हणाले, ‘‘हवामानातील बदलांना लहान मुलांचे शरीर सरावलेले नसते. त्यामुळे या वातावरणात लगेचच मुले आजारी पडतात. त्यात ताप खूप जास्त येतो. त्यानंतर सर्दी आणि खोकला सुरू होतो. १५ ते २४ वर्षे वयोगटामध्ये प्रमाण सर्वाधिक आहे. त्यांना डेंगीची स्पष्ट लक्षणे दिसतात. ही मुले शाळा आणि महाविद्यालयाच्या निमित्ताने घराबाहेर असतात. त्यातून त्यांना डास चावून डेंगी किंवा संशयित डेंगी झाल्याचे दिसते.’’

का वाढले रुग्ण?

  • शहरात पावसाच्या अधून-मधून सरी पडत आहेत. त्यानंतर उन्ह पडते, असे वातावरण विषाणुजन्य आजारांच्या वाढीस पोषक असते.

  • त्याचवेळी पावसाच्या साचलेल्या पाण्यावर डासोत्पत्ती होऊन डेंगी आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

  • दूषित पाण्यामुळे आणि अस्वच्छ अन्नपदार्थ खाण्यात आल्याने पोटाच्या तक्रारी वाढल्या आहेत.

अशी घ्या काळजी...

  • फ्लू प्रतिबंधक लसीकरण करा

  • आजारी मुलांना शाळेत पाठवू नका

  • भरपूर प्रमाणामध्ये पाणी प्या

  • आहारात ताजे अन्नपदार्थ घ्या

  • औषधे वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेऊ नका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सरकारी जमिनीवर बांधलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाने तोडफोड मोहीम

Hampi Tourism: फक्त 2 दिवसात हंपी एक्सप्लोर करायचंय? ही ठिकाणं नक्की पाहा!

INDW vs PAKW: ४,४,४ प्रतिकाने केलेली सुरुवात अन् मग ऋचाच्या आक्रमणाने केला शेवट; भारताचे पाकिस्तानसमोर मोठे लक्ष्य

Jayakumar Gore: रामराजेंचं प्रेम करायचं वय निघून गेलंय: पालकमंत्री जयकुमार गोरे; रणजितसिंहांकडे मैत्रीचा हात पुढे केला अन्..

अब मजा आयेगा ना भिडू! प्रियाचे खरे आई-वडील अखेर सापडलेच; खोटी तन्वी प्रतिमाला त्रास देताना रविराज स्वतः पाहणार, आजच्या भागात काय घडणार?

SCROLL FOR NEXT