पुणे

पुणे परिसरात गारठा वाढणार; हवामान तज्ज्ञांचा अंदाज

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहर आणि परिसरात पुढील दोन दिवसांमध्ये हवेतील गारठा वाढेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. पुण्यात बुधवारी सकाळी साडेआठपर्यंत 16.2 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदला गेलेला किमान तापमानाचा पारा पुढील तीन दिवसांमध्ये 13 अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल, असेही हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले. 

अरबी समुद्रावरील कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव आता ओसरला आहे. त्यामुळे शहर आणि परिसरातील आकाश निरभ्र झाले. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस हवामान कोरडे राहणार असल्याने हवेतील गारठा पुन्हा वाढेल, असे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. पुण्यात शिवाजीनगर येथील वेधशाळेत 16.2, पाषाण येथे 16.8 आणि लोहगाव येथे 17 अंश सेल्सिअस इतक्‍या किमान तापमानाची नोंद झाली. शहरात सध्या हवेतील आर्द्रता वाढलेली आहे. पण, येत्या गुरुवारपासून आर्द्रतेचे प्रमाण कमी होईल. 

का वाढेल गारठा? 
उत्तर भारतातून महाराष्ट्राच्या दिशेने वाहणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढतो. राज्याच्या बहुतांश भागात कोरडे हवामान असल्याने उत्तरेतील थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढेल. त्यामुळे राज्यात गारठा वाढण्याची शक्‍यता हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आली. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे 15.3 अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुढील दोन दिवसांमध्ये विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रात पुन्हा गारठा वाढणार आहे. पावसामुळे गारठ्यात झालेल्या वाढीमुळे किमान तापमानात घट होऊ लागली आहे. सध्या विदर्भात 16 ते 18, मध्य महाराष्ट्रात 14 ते 19, मध्य महाराष्ट्रात 15 ते 18, तर कोकणात 20 ते 22 अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान आहे. 

चक्रीवादळासाठी पोषक स्थिती 
दक्षिण भारताच्या पूर्व भागातील बंगालच्या उपसागराचा नैर्ऋत्य भाग व श्रीलंकेची किनारपट्टी आणि कोमोरीन परिसर व श्रीलंका या भागांतही चक्रीवादळासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, अरबी समुद्राच्या दक्षिण भागात चक्रीवादळासाठी पोषक स्थिती आहे. त्यामुळे राज्यात पुढील काही दिवस थंडीत काही अंशी चढ-उतार राहणार असून, किमान तापमान कमी-अधिक स्वरूपात राहणार आहे. उत्तर भारतातही गेल्या काही दिवस पाऊस झाल्याने हवेत गारवा असल्याने काही भागांत थंडीची लाट आली आहे. त्यामुळे या भागात किमान तापमानात आणखी घट होईल. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होण्याची शक्‍यता आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Mayor : कोल्हापूरच्या महापौरपदी भाजपच्या रुपाराणी निकम, पण किती काळ? चंद्रकांतदादांनी केला मोठा खुलासा

Latest Marathi News Live Update: चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदावरून काँग्रेसच्या दोन गटात वाद

Navi Mumbai Mayor: नवी मुंबई सत्तेसाठी भाजप-सेना आमनेसामने! महापौर कोण होणार? निवडणुकीच्या तारखेसह 'या' 2 नेत्यांची नावे समोर

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या भाषणावर सत्ताधाऱ्यांनी का घातला गोंधळ? विरोधी पक्षनेत्याला बोलूच दिलं नाही; कामकाज तहकूब करण्याची वेळ

Viral : चार वर्षांच्या मुलाला शेतात खेळताना सापडला ४०० वर्षांपुर्वीचा खजिना, किंमत ऐकून तुमचेही डोळे विस्फारतील

SCROLL FOR NEXT