Pune University Sakal
पुणे

महाविद्यालयांच्या परीक्षा होणार ऑनलाइनच

विद्यापीठाची स्पष्टोक्ती; वेळापत्रक जाहीर करण्यास सुरवात

सम्राट कदम

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील सत्र परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहे. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने १५ फेब्रुवारीनंतर ऑफलाईन परीक्षांसाठी परवानगी दिली होती. मात्र तो पर्यंत विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षांची तयारी पूर्ण केल्याने कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

फेब्रुवारी व मार्च महिन्यात ऑनलाइन पद्धतीने पार पडणाऱ्या या परीक्षेसाठीची अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असून, काही विद्याशाखांचे वेळापत्रकही घोषित करण्यात आले आहे. विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार शैक्षणिक वर्ष २०२१-२२च्या प्रथम सत्रातील पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या नियमित व अनुशेषित, तसेच बहि:स्थ, श्रेणीसुधार परीक्षेसाठी अर्ज भरलेल्या पात्र विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे आयोजन फेब्रुवारी-मार्च दरम्यान टप्प्या-टप्प्याने करण्यात येणार आहे.

अशी असेल परीक्षा -

  1. बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू)

  2. ६० प्रश्नांमधून ५० अचूक प्रश्नांची उत्तरे ग्राह्य धरणार

  3. विज्ञान, प्रथम वर्ष बीसीए (विज्ञान) व अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील गणित व संख्याशास्त्र विषयांसाठी ३० प्रश्न विचारले जातील. त्यातील २५ प्रश्नांची अचूक उत्तरे ग्राह्य धरणार

  4. -परीक्षेत तांत्रिक कारणाने खंड पडल्यास विद्यार्थ्यांना ‘सॉफ्टवेअर’मार्फत आपोआप वेळ वाढवून मिळणार

  5. विद्यार्थ्यांना परीक्षेबाबतची माहिती एसएमएस व ई-मेलद्वारे देण्यात येईल

ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यापीठाची तयारी पूर्ण झाली असून ऐनवेळी निर्णय बदलल्यास अधिक संभ्रम वाढेल. विद्यापीठाने मागील दोन वर्ष यशस्वीपणे ऑनलाइन परीक्षा पार पाडल्या असून, यंदाही काटेकोर पद्धतीने परीक्षा पार पडणार आहे. पुढील आठवडाभरात सर्वच विद्याशाखांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होत आहे.

-डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

ऑनलाइन शिक्षण(online education) आणि परीक्षांमुळे योग्य मूल्यमापन होत नाही. शेवटच्या वर्षाला असल्यामुळे ऑफलाईन परीक्षा होईल, असे वाटले होते. मात्र कोरोनाच्या (corona)प्रसाराच्या पार्श्वभूमीवर आता ऑनलाइन परीक्षा होत असून, त्याची आम्ही तयारी करत आहोत.

- ओम लटपटे, विद्यार्थी, विधी शाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई गोवा मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, वाहनांच्या ८ ते ९ किमी रांगा; प्रवाशी संतप्त

Aditi Swami Success Story : अर्जुन पुरस्कार विजेत्या आदितीचा डंका! मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी वर्णी; ओजस देवतळे, प्रथमेश फुगे यांचीही नियुक्ती

Koyna Dam Bridge Update : छत्रपती शिवाजी महाराज जलाशयावरील बहुचर्चित आहिर-तापोळा केबल स्टे ब्रिज कधी खुला होणार? 95 टक्के काम पूर्ण, T & T कंपनीनं काय सांगितलं?

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

WOMEN'S ASIA CUP 2026: फायनलआधी टीम इंडियाची फिल्डिंग ठरतेय डोकेदुखी! ४ झेल सुटले, दीप्ती शर्माने सांगितलं ‘या’ सामन्यात चूक होणार नाही

SCROLL FOR NEXT