student 
पुणे

दापोडीतील 'या' विद्यार्थ्यांचा आदर्श घ्यायलाच हवा! 

मिलिंद संधान

नवी सांगवी (पुणे) : दापोडी येथील सी. के. गोयल कला व वाणिज्य महाविद्यालयाचे विद्यार्थी कोरोनाच्या संकट काळात सामाजिक जाणिवेतून सक्रीय मदत कार्यात सहभागी झाले आहेत.

महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे हे विद्यार्थी स्वतः घरात सुरक्षित राहून फेसबुक, व्हॉट्सअप यासारख्या सोशय मिडियाचा आधार घेऊन देशावरील संकटाशी दोन हात करण्यासाठी नागरिकांचे प्रबोधन करून जनजागृती करीत आहेत. प्रशालेचे प्राचार्य डॉ विकास पवार व एनएसएसचे प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब माशेरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे विद्यार्थी स्वतःहून या सक्रीय कार्यात सहभागी झाले आहेत. 

विविध सामाजिक संस्था व मंडळांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात हे विद्यार्थी स्वतःहून भाग तर घेतातच पण इतरांनाही त्यासाठी उद्युक्त करतात. तसेच कोरोनाच्या जनजागृतीच्या घोषवाक्यांची कागदी भित्तीपत्रे स्वतः रंगवून तयार केली आहेत. त्या भित्तीप्रत्रांचे व्हिडीओ तयार करून सगेसोयरे व मित्रपरिवारांमध्ये ते व्हायरल केले जात आहेत. त्याच बरोबर प्रत्येक विद्यार्थ्याने दहा कुटुंब दत्तक घेतली आहेत. आणि त्या कुटुंबियांशी सतत संपर्क ठेऊन त्यांना अडचणीच्या काळात पोलिस व मनपा प्रशासनाच्या मार्फत मदत केली जात आहे. तसेच शासकीय योजनांची माहिती हे विद्यार्थी नागरिकांमध्ये पोहचवीत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एनएसएसचे प्राध्यापक डॉ. माशेरे म्हणाले, "राष्ट्रीय सेवा योजनेच्या 'नॉट मी बट यु ' या उद्दीष्टानुसार आम्ही कार्यरत आहोत. विद्यार्थ्यांनी आरोग्य सेतू अँप त्यांच्या स्मार्ट फोनमध्ये डाऊनलोड केले आहे. त्यातून त्यांनी आय गॉट गव्हर्नमेंट अँप हे अंतर्गत प्रशिक्षण घेतले आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी स्वतः मास्क तयार केले असून, स्थानिक प्रशासनाचा आदेश आल्यास मदत कार्यात आम्ही सहभागी होणार आहोत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT