Savitribai Phule Pune University Sakal
पुणे

संलग्न महाविद्यालयांना ‘एआएसएचई’च्या पोर्टलवर नोंदणी अनिवार्य

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनी आणि परिसंस्थांनी ‘ऑल इंडिया सर्व्हे ऑन हायर एज्युकेशन’च्या (एआएसएचई) पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे.

मिनाक्षी गुरव

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनी आणि परिसंस्थांनी ‘ऑल इंडिया सर्व्हे ऑन हायर एज्युकेशन’च्या (एआएसएचई) पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, मान्यताप्राप्त परिसंस्थांनी दरवर्षीप्रमाणे २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाची माहिती वेबपोर्टलवर भरण्याबाबत अनेकदा सूचना केल्या आहेत. नव्याने मान्यता दिलेल्या संस्थांनीही नोंदणी करणे गरजेचे आहे.

नोडल अधिकाऱ्यांचे नाव, मोबाईल नंबर, महाविद्यालय व परिसंस्थांचा नोंदणी क्रमांक, ई-मेल आयडी, शासन निर्णय, संलग्नीकरणाचे पत्र अशी माहिती पोर्टलवर अपलोड करून महाविद्यालयांना नोंदणी करावी लागणार आहे. आतापर्यंत ‘ऑल इंडिया सर्व्हे ऑन हायर एज्युकेशन’पोर्टलवर नोंदणी न करणाऱ्या महाविद्यालयांना, त्याबाबतचा खुलासा उच्च शिक्षण संचालक कार्यालयाकडे सादर करावा लागणार आहे, असेही विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे सहाय्यक कुलसचिव पां. गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजय साळगावकर '2 ऑक्टोबर'ला पुन्हा भेटीला येणार, दृश्यम ३ ची घोषणा, अक्षय खन्ना खलनायकाच्या भूमिकेत?

Kolhapur Child Death : धक्कादायक! विहिरीत बुडून आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, रात्रीच्या वेळी घटना; विहिरीत कॅमेरेसोडून शोध

Latest Marathi News Live Update : श्रीलंकेच्या नौदलाकडून १२ भारतीय मच्छिमारांना अटक

दुर्दैवी घटना! रोटावेटर अंगावर पडून एकाचा मृत्यू; नेवासे तालुक्यातील घटना, घरच्यांचा वारंवार फोन अन् काय घडलं?

Kidney Trafficking: किडनी विक्री प्रकरणातील एजंट ‘डॉ. कृष्णा’ निघाला इंजिनिअर, सोलापुरात केली अटक; बनावट नावाने पीडित शोधायचा

SCROLL FOR NEXT