supe. 
पुणे

शेतकऱ्यांनो, पिकांच्या पंचनाम्यासाठी ही कागदपत्रे ठेवा तयार  

जयराम सुपेकर

सुपे (पुणे) : बारामती तालुक्यातील सुपे परिसरातील गावांत वादळी वारे व जोरदार मुसळधार पावसामुळे ऊस, बाजरी सारखी पिके भूईसपाट झाली. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या पिकांचे पंचनामे करण्याचे काम महसूल व कृषी विभागामार्फत चालू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी सात-बारा, आठ अ उतारा, आधारकार्ड, बँक पासबुकाची झेरॉक्सप्रत, अर्ज व नुकसानग्रस्त पिकाचा फोटो तयार ठेवावा. 

याबाबत तालुका कृषी अधिकारी दत्तात्रेय पडवळ यांनी माहिती दिली की, सुपे व परिसरात रविवारी (ता. ६) रात्री दोन तासात ११३.५० मि.मी. पावसाची नोंद झाली. सुपे व परिसरात कामगार तलाठी आर. एन. चौधरी, कृषी सहायक अमोल लोणकर यांनी पंचनामे सुरू केले आहेत. कोरोना साथीमुळे सुरक्षेचे नियम पाळून पंचनामे करण्यास अधिकचा वेळ लागत आहे. अवकाळी पाऊस, वादळी वारे व गारपीटीमुळे नुकसान झाल्याची माहिती क्षेत्रीय स्तरावरून नजर अंदाजित करण्यात आली आहे. प्रत्यक्ष पंचनाम्यानंतर या आकडेवारीत बदल होऊन नेमकी आकडेवारी मिळणार आहे. 

तालुक्यात पीकनिहाय क्षेत्र हेक्टरमध्ये पुढीलप्रमाणे : ऊस- १६३२, बाजरी- १३६४, मका- ५५५, कांदा- १११, सोयाबीन- ८२, भाजीपाला- ९६. असे मिळून ३ हजार ८४० हेक्टर क्षेत्रातील सुमारे ८ हजार १६० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आंबी खुर्द परिसरातही पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, पंचनामे करण्याची मागणी बाजार समितीचे माजी उपसभापती रघुनाथ कुतवळ यांनी केली आहे.

निसरड्या रस्त्यामुळे अपघात
कृषी सहायक लोणकर यांनी सांगितले की, कुतवळवस्ती परिसरात पंचनामे करण्यास दुचाकीवरून गेलो असता. निसरड्या रस्त्यामुळे दुचाकी घसरून इजा झाली. अशा स्थितीत त्या परिसरात पंचनामे केले. या वेळी राहुल बोडरे, गोरख कुतवळ, सोमनाथ कुतवळ, मोहन कुतवळ आदी शेतकरी उपस्थित होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jemimah Rodrigues बनली कर्णधार, आता स्मृती मानधना, हरमप्रीत कौरलाही देणार टक्कर! तीन वेळा उपविजेत्या ठरलेल्या संघाचा मोठा निर्णय

Swiggy food trends 2025 : भारतीयांनी २०२५ मध्ये ‘स्विगी’वर सर्वाधिक ऑर्डर केला ‘हा’ पदार्थ; तुम्ही खाल्लाय का?

Latest Marathi News Live Update : सदानंद दाते लवकरच महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक!

Solapur News : विद्या मंदिर चे स्नेहसंमेलन म्हणजे ग्रामीण मुलांसाठीची पर्वणीच- तहसीलदार मदन जाधव.

अमृता खानविलकरची नवी इनिंग! सुरू केला स्वतःचा बिझनेस; कसला व्यवसाय सुरू केला माहितीये?

SCROLL FOR NEXT