once again from MSEDCL Claim that Compared to the rates approved by the commission the rates before March have come down 
पुणे

वीजदर वाढीबाबत महावितरणाने पुन्हा एकदा केला 'हा' दावा 

सकाळवृत्तसेवा

पुणे : मार्चपूर्वी लावलेला इंधन समायोजन आकार विचारात घेतला आणि महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने मंजूर केलेल्या वीजदरांची तुलना केल्यास जवळपास सर्व वर्गवारींच्या ग्राहकांच्या वीजदरात घट झालेली आहे, असा दावा पुन्हा एकदा महावितरणकडून करण्यात आला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

महावितरणने प्रस्तावित केलेल्या वीजदर वाढीच्यापेक्षा आयोगाने जास्त वाढ दिली असल्याचे समोर आले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महावितरणने हा दावा केला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला काही महिन्यांचा इंधन समायोजन आकार हा उणे येणे अपेक्षित आहे. आयोगाने इंधन समायोजन आकारातील संभाव्य फरक लक्षात घेऊन महावितरणला इंधन समायोजन आकार स्थिरीकरण निधीपोटी 1 हजार 500 कोटी इतक्‍या मर्यादेपर्यंत रक्कम मान्य करून दिली आहे. भविष्यकाळात वीज खरेदी खर्चात अनपेक्षीत वाढ झाल्यास सदर रकमेचा वापर इंधन समायोजन आकाराकरिता करता येईल आणि सदर रक्कम संपुष्टात येईपर्यंत ग्राहकांना इंधन समायोजन आकार लावण्यात येणार नाही, असेही आदेश दिले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या वीजदरात स्थिरता येण्यास मदत होणार आहे, असेही महावितरणचे म्हणणे आहे. 

पुणेकरांनो ही चूक करु नका, नाहीतर... धडा शिकविण्याची प्रशासनाची भूमिका

आयोगाच्या आदेशानुसार घरगुती वर्गवारीतील ग्राहकांसाठीच्या सरासरी वीजदरात सुमारे पाच टक्‍क्‍यांची घट झाली आहे. त्यामुळे, वीजदरांमध्ये 50 पैसे ते 1 रुपया इतकी वाढ झाली असे म्हणणे संयुक्तिक होणार नाही. वीज खरेदीच्या खर्चापेक्षा जास्त खर्च झाल्यास त्याच्या वसुलीसाठी इंधन समायोजन आकार आकारण्यात येतो. त्यामुळे इंधन समायोजन आकार हा वीजदराचा अविभाज्य भाग आहे. म्हणूनच ग्राहकांच्या वीजदरांची तुलना करताना इंधन समायोजन आकाराचा त्यामध्ये समावेश करणे आवश्‍यक आहे. वीज खरेदी खर्चामधील होणारी अपेक्षित वाढ लक्षात घेऊन आयोगाने इंधन समायोजन आकार ह्या घटकाचा समावेश 2024-25 पर्यंतच्या वीजदरात केला आहे, असेही महावितरणने म्हंटले आहे. 

फायनान्स कंपनीलाच घातला 51 लाखांना गंडा; कसा? वाचा सविस्तर

स्थिर आकारांमध्ये ग्रामीण भागासाठी दहा रूपये प्रति महिना आणि शहरी भागासाठी 20 रूपये प्रति महिना इतकी किरकोळ वाढ झाली असली तरीही विद्युत आकारात लक्षणीय घट झाली आहे. परिणामत ग्राहकांना भराव्या लागणाऱ्या देयकांमध्ये घट झालेली आहे, असा दावाही महावितरणकडून करण्यात आला आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, अर्धनग्नावस्थेतला VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT