Pune Municipal 
पुणे

महापालिकेला केलेल्या एक कोटी रुपयांच्या दंडप्रकरणाची दखल आयुक्तांनी घेतली

सकाळवृत्तसेवा

पुणे - ठेकेदाराला वेळेत बिल आदा केले नाही, म्हणून लवादाने महापालिकेला केलेल्या एक कोटी रुपयांच्या दंड प्रकरणाची दखल अखेर महापालिका आयुक्तांनी घेतली आहे. विद्युत विभागाचे अधिक्षक अभियंता यांना अतिरिक्त आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे.

शहरातील स्ट्रीस्ट लाइटवर एलईडी दिवे आणि स्काडा सिस्टिम बसविण्याचे काम महापालिकेने निविदा काढून २०१६ मध्ये मे टाटा प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीस दिले होते. हे काम करीत असताना तांत्रिक अडचणी लक्षात आल्याने कंपनीने ते महापालिकेच्या निदर्शनास आणून दिले होते. प्रशासनाने देखील ते मान्य करीत निविदेतील कामाव्यतिरिक्त वाढीव काम करण्यास सर्व प्रक्रिया पूर्ण करून संबंधित कंपनीला आयुक्तांनी परवानगी दिली होती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यानुसार काम पूर्ण केल्यानंतर संबंधित कंपनीला कामाचे बिल आदा करण्याऐवजी विद्युत खात्याने त्यावर आक्षेप घेत ते अडवून ठेवले होते. त्यावर संबंधित कंपनीने लवादापुढे दाद मागितली होती. लवादाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर विद्युत विभागाची चूक असल्याचे निदर्शनास आणून देत महापालिकेला कामाचे बिल आदा करण्याचे आदेश दिले होते. तसेच बिल आदा करण्यास झालेल्या विलंबाबद्दल संबंधित कंपनीला भरपाई देण्याचे आदेशही महापालिकेला दिले होते. त्यामुळे विद्युत विभागाच्या या अजब कारभारामुळे महापालिकेला तब्बल एक कोटी रुपयांहून अधिक भुर्दंड भरावा लागणार असल्याबाबतचे वृत्त सकाळने दिले होते. त्याची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने संबंधित विभागाचे अधिक्षक अभियंता श्रीनिवास कंदुल यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे.

या प्रकरणी विद्युत विभागाचे अधिक्षक अभियंता श्रीनिवास कंदुल यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. त्याच्याकडून त्यावर खुलासा प्राप्त झाला आहे. लवकरच त्यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल.
- कृणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट; पुढील दोन दिवसांत निर्णयाची शक्यता, ऑगस्टचा १५०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार?

Weekly Horoscope: १४ ते २० सप्टेंबरचा आठवडा ठरणार खास! या राशींना मिळणार पैसा, करिअरमध्ये संधी आणि प्रेमात सुख

Koyna Dam : सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग

Marathi News Live Updates : वरंधा घाटात मध्यरात्री दोन कारची समोरासमोर धडक, तिघे गंभीर जखमी

Ratnagiri CNG: ऐन गणेशोत्सवात सीएनजीचा ठणठणाट; रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वरात रांगा; चाकरमानीसह रिक्षाचालक त्रस्त

SCROLL FOR NEXT