Committee appointed to announce CET revised schedule 
पुणे

सीईटी सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यासाठी नेमली समिती; तालुका स्तरावर होणार केंद्र

सकाळवृत्तसेवा

पुणे: बारावीनंतर अभियांत्रिकी आणि इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेल्या 'राज्य सामाईक प्रवेश परीक्षां'चे (CET) सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यासाठी सीईटी सेलच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. दरम्यान, सीईटीसाठी तालुका स्तरावर केंद्र तयार करण्याची सूचना ही करण्यात आली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षांसंदर्भात उदय सामंत यांनी कुलगुरूंची बैठक घेतली. त्यावेळी बारावी नंतर अभियांत्रिकी, औषधनिर्माण यासह अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसंदर्भात चर्चा करण्यात आली. यूजीसीने जाहीर केलेल्या नियमावलीत १ सप्टेंबर पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणे आवश्यक आहे. त्यासाठी या परीक्षांचे व्यवस्थित नियोजन करणे व निकाल जाहीर करणे आवश्यक आहे. यावर सर्व उपाययोजना करून वेळापत्रक तयार करण्यासाठी सीईटीसेलचे अध्यक्ष संदीप कदम यांची समिती नेमली आहे, असे सामंत यांनी संगितले.

पुणेकर कन्फ्यूज; सरकार म्हणतंय दुकानं सुरू, व्यापाऱ्यांची वेगळीच भूमिका

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी " विद्यार्थ्यांना प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी सध्या असलेल्या जिल्हा स्तरावरील सीईटी केंद्राची संख्या वाढविणे गरजेचे आहे. प्रत्येक तालुका स्तरावर केंद्र तयार करण्यात यावे अशी सूचना केली आहे. 

आता वकिलांना घरबसल्या करता येणार दावे दाखल; सर्वोच्च न्यायालयाने उचलले महत्वाचे पाऊल

या शक्यतेवरही झाली चर्चा
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) २० ते ३० जुलै दरम्यान घेण्यात येतील का? आणि या परीक्षेचा निकाल १५ ऑगस्ट पर्यंत जाहीर करुन १ सप्टेंबर पासून नवीन वर्षाचे वर्ग सुरू करता येतील का यावर चर्चा करण्यात आली, असे सामंत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Betting : ऑनलाइन बेटिंगमुळे कर्ज झाल्याने संपविले जीवन; प्रथमेशच्या लेटर नोटमधील माहिती

Palghar News : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला आणि अटक वॉरंटची मागणी

Marathi News Live Updates : हडपसरमधील माळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; एका घरात सिलेंडरचा स्फोट

Shirur Maratha reservation protest: शिरूरमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; मराठा आरक्षणासाठी पुणे–नगर मार्गावर रास्ता रोको

Takli Rajeray Crime : टाकळी राजेराय पोलिसांची धडक कार्यवाही; दोनशे किलो गोमांस जप्त

SCROLL FOR NEXT