पुणे

कोरोनाला दूर ठेवण्यासाठी कंपनीत 'बायो-बबल'चा फंडा!

महेंद्र शिंदे

खेड-शिवापूर(pune) : कामगारांच्या घरून कोरोनाचा (corona) संसर्ग कंपनीत येऊ नये आणि कंपनीतून कोरोनाचा संसर्ग कामगारांच्या घरी जाऊ नये, यासाठी वरवे बुद्रुक (ता.भोर) येथील एईएस सील इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने बायो बबल(Bio Bubble) (जैव सुरक्षित वातावरण) हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत कामगार कंपनीतच सुरक्षित राहून काम करत आहेत. त्यामुळे कामगार आणि कामगारांचे कुटुंबीय यांचा कोरोनापासून बचाव होण्यास मदत होत आहे. इतर कंपन्यांनीही कोरोना काळात असा उपक्रम राबविण्याची आवश्यकता आहे.(Company created Bio-Bubble to keep Corona away)

कोरोना काळातही उद्योग सुरू ठेवण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मात्र कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या गावचे, वेगवेगळ्या ठिकाणचे कामगार कामास असतात. त्यामुळे कामगारांच्या घरून कंपनीत किंवा कंपनीतून कामगारांच्या घरी कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती असते. हे लक्षात घेऊन भोर तालुक्यातील वरवे बुद्रुक येथील एईएस सील इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व्यवस्थापन आणि वरवे बुद्रुक ग्रामपंचायत यांनी मिळून कंपनीत बायो बबल (जैव सुरक्षित वातावरण) हा उपक्रम सुरू केला आहे.

या कंपनीत एकूण 121 कामगार आहेत. त्यातील सुमारे 50 टक्के कामगार वर्क फ्रॉम होम करतात. तर तर उर्वरीत 75 कामगारांची विभागणी करून कामाचे नियोजन करण्यात आले आहे. 75 कामगारांपैकी 35 कामगार एक आठवडा काम करतात. उर्वरीत 35 कामगार पुढच्या आठवडाभर काम करतात. तर पहिल्या आठवड्यात काम करणाऱ्या कामगारांना पुढील आठवडाभर पगारी सुट्टी देण्यात येते.

कामावर येण्यापूर्वी दोन दिवस अगोदर कामगारांची आरटीपीसीआर कोरोना चाचणी करण्यात येते. तर कामावर रुजू होताना अँटीजेन चाचणी करण्यात येते. त्यांनतर आठवडाभर कामगार कंपनीत राहून काम करतात. कंपनी व्यवस्थापनाकडून कंपनीतच कामगारांच्या राहण्याची, झोपण्याची, जेवण-नाष्टा आदींची सर्व सोय करण्यात आली आहे. या काळात कामगारांच्या घरी काही आवश्यक साहित्य, औषधे, वैद्यकीय गरज हवी असल्यास त्यासाठी कंपनी व्यवस्थापनाने दोन जणांची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडून कंपनी कामगारांच्या घरी आवश्यक साहित्य पुरविले जाते.

एईएस सील इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापक पराग जाधव म्हणाले, "कोरोना काळात कंपनी सुरू राहून कामगार आणि त्यांच्या कुटुंबाचा कोरोनापासून बचाव झाला पाहिजे, या विचाराने आमचे कंपनी व्यवस्थापन आणि वरवे बुद्रुकचे सरपंच राहुल यादव, उपसरपंच अनिल माने, ग्रामपंचायत सदस्य विश्राम सोंडकर, देविदास माने यांनी हा उपक्रम कंपनीत सुरू केला आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नयन पटेल यांनीही या उपक्रमाला पाठींबा दिला. या उपक्रमामुळे कोरोनापासून कामगार आणि त्यांच्या कुटुंबाचा बचाव होत असून कामगार सुरक्षित वातावरणात राहत आहेत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PLAYOFF SCENARIO: सनरायझर्स हैदराबादचा विजय, पण गुजरात टायनट्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचले? 'बाय वन गेट वन' ऑफर

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपले? SRHने विजयासह GT ला अंतिम ४ मध्ये पोहोचवले; १ जागा ३ स्पर्धक...

IPL 2026 Controversy : संजू सॅमसनने विजेच्या वेगाने बेल्स उडवल्या... OUT होताच हेनरिच क्लासन खवळला, अंगावर धावला Video

Gautam Adani: अमेरिकेत गौतम अदानींचा मोठा विजय! US मधील खटला कायमचा बंद; न्याय विभागाने आरोप मागे घेतले

Pune Council Seat Battle: पुणे विधान परिषद जागेसाठी राष्ट्रवादी-भाजपमध्ये रस्सीखेच

SCROLL FOR NEXT