Competitive Exam Student are facing problem during lockdown
Competitive Exam Student are facing problem during lockdown 
पुणे

Corona Virus : स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी वर्ग अडचणीत

महेश जगताप

स्वारगेट : स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आलेली बहुसंख्य मुलं-मुली ही शेतकरी, कष्टकरी कामगार, मजूर कुटुंबातून आलेली आहेत. कोरोना संकटाचा या वर्गाला मोठा फटका बसला आहे, त्यामुळे आता विद्यार्थ्यांना दरमहा मिळणारी थोडीफार रक्कम ही मिळणं आता अवघड बनणार आहे. त्यामुळे एकीकडे परीक्षा कधी होणार याची अनिश्चितता, कुटुंबावर ओढावलेले आर्थिक संकट, पुण्यात राहण्याचे निर्माण झालेले प्रश्न, घरमालकांचा रूमभाड्यासाठी तगादा, क्लासचालकांकडे अडकून पडलेली फी, अनिश्चित व असुरक्षिततेमुळे आलेली प्रचंड निराशा अशा असंख्य प्रश्नांचा डोंगर त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांना मोठ्या संकटांना सामना करावा लागत आहे .

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असलेले विद्यार्थी सध्या एक मोठ्या अस्वस्थतेला सामोरे जात आहेत. राज्यात लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. त्यामध्ये पुण्यात येऊन अभ्यास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अचानक संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर झाले. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे काही विद्यार्थी गावाकडे परत गेले. मात्र २१ दिवस सगळं बंद होईल याची कल्पना नसल्याने हजारो विद्यार्थी पुण्यात अडकून पडले. मेस, हॉटेल, खानावळी सगळंच बंद झाल्याने त्यांच्या जेवणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. लॉकडाऊनमुळे गावाकडे ही जाता येईना अन इथे खाण्या-पिण्याची सोय होईना अशी परिस्थिती निर्माण झाली. 

हेही वाचा : Coronavirus:स्थानिक संपर्कातून सर्वाधिक रुग्ण; पुण्यात कोरोनाचे 142 पैकी 122 रुग्ण परदेश दौरा न केलेले

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेण्यात येत असलेल्या सर्वच परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले आहे. सध्याच्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे किमान काही महिन्यांसाठी तरी परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या आहेत.

विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रश्न, समस्या उभ्या टाकल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी क्लासची फी ऍडव्हान्समध्ये भरली आहे. मात्र या काळात क्लास झाले नाहीत, त्याची भरपाई क्लासचालक करणार ? घरमालक रूमभाडे, कॉटेजचे पैसे देण्यासाठी तगादा लावत आहेत.
- सचिन ढवळे शिक्षक स्पर्धा परीक्षा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT