corona1
corona1 
पुणे

भोरच्या कोविड केअर सेंटरच्या तक्रारीबाबत तहसीलदार म्हणतात...

विजय जाधव

भोर (पुणे) : भोर तालुक्यातील कोविड केअर सेंटरमध्ये असलेल्या कोरोना रुग्णांवर योग्य प्रकारे उपचार सुरू असून, त्यांना सर्व सोयीसुविधा पुरविण्यात येत असल्याचे मुख्याधिकारीपदाचा पदभार असलेले तहसीलदार अजित पाटील यांनी सांगितले. 

कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाग्रस्तांना योग्य त्या सोयीसुविधा मिळत नसल्याची तक्रार काही रुग्णांच्या नातेवाईकांनी केली होती. त्यावर तहसीलदार अजित पाटील यांनी प्रशासनाच्या वतीने कोरोनाग्रस्तांवर केल्या जाणा-या उपचारांची आणि कोविड केअर सेंटरमधील सोयीसुविधांची माहिती दिली.  शहरातील औद्योगीक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) कोरोनाग्रस्तांवर उपचार केले जात आहेत.  कोरोनाबरोबर इतर आजार असलेले आणि अत्यावश्यक असलेल्या रुग्णांना पुण्याला पाठविण्यात येत आहे. 

येथील कोविड केअर सेंटरमध्ये ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रेय बामणे व पंचायत समितीच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना रुग्णावर वेळेवर औषधोपचार केले जात आहेत. नवीन कोरोनारुग्णांचे स्वॅब घेणे, त्यांना क्वारंटाईन करणे, कोरोना पॉझिटिव्ह असलेल्यांना गोळ्या-औषधे देणे आदी कामे दररोज केली जात आहेत. उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका डॉक्टरची यासाठी दररोज नियमीतपणे ड्युटी ठेवण्यात आली आहे. याशिवाय नगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत कोविड केअर सेंटरची साफसफाई व स्वच्छता नियमितपणे केली जात आहे. सध्या आयटीआयमधील कोविड केअर सेंटरमध्ये १३ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु आहेत. भोरमध्ये कोरोनाग्रस्तांवर उपचार व्यवस्थीतपणे सुरु असून, नागरिकांनी प्रशासनावर विश्वास ठेवून चुकीची माहिती न परविण्याचे आवाहन केले.

आज पुन्हा चार जण पॉझिटिव्ह
 भोर तालुक्यात आज आणखी चार कोरोनाग्रस्त पॉझिटिव्ह झाले असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे यांनी सांगितले. यामध्ये भोर शहरातील दोन आणि कारी व पिसावरे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३८ झाली असून, कोरोनावर मात केलेल्या काही रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. याशिवाय कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांचे स्वँब घेणे दररोज सुरु आहे.

Edited by : Nilesh Shende

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

ICC Ranking: वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने भारताकडून हिसकावलं कसोटीचं सिंहासन; पण वनडे - टी20 मध्ये रोहितसेनाच अव्वल

Dharmendra And Hema Malini: 44 वर्षानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी पुन्हा केलं लग्न? रोमँटिक फोटो व्हायरल

Planet Nine : नेपच्यूनच्या पलीकडे असू शकतो आणखी एक ग्रह; आतापर्यंत राहिला होता लपून.. शास्त्रज्ञांना मिळाले नवे पुरावे!

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

SCROLL FOR NEXT