Stomach
Stomach Sakal
पुणे

पोट सुटलेल्यांनो, सावधान! घेराबरोबरच वाढली कोरोना उपचारातील गुंतागुंत

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पोटाचा (Stomach) घेर वाढलेल्यांनो सावधान! (Alert) तुम्हाला कोरोना (Corona) झाल्यास त्याच्या उपचारातील (Treatment) गुंतागुंत (Complication) वाढते. त्यामुळे आताच सावध होऊन वाढलेले पोट कमी करण्याचे प्रयत्न सुरू करा. (Complications in Corona Treatment Increased Careful Thick People)

देशातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण पुण्यात होते. अशा वेळी स्थुलतेमुळे कोरोनाच्या उपचारात नेमके कोणते अडथळे येतात, या बाबतचा शास्त्रिय अभ्यास ‘लेप्रो ओबोसे सेंटर’चे (एलओसी) संचालक आणि ‘इंडियन ओबेसिटी सर्जरी सोसोयटी’चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शशांक शहा आणि डॉ. पूनम शहा यांनी केला. त्यातून हा निष्कर्ष निघाला आहे.

पोट सुटलेल्यांमध्ये का वाढतो कोरोनाचा धोका?

पोट सुटलेल्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग अतीतीव्र असतो. विशेषतः पुरूषांमध्ये याची तीव्रता अधिक असल्याचा निष्कर्ष विश्लेषणातून निघाला आहे. त्यामुळे कोणत्याही वयोगटातील पोट सुटलेल्या पुरुषांनी कोरोना प्रतिबंधक उपायांचे काटकोरपणे पालन करा. पोट मोठं असल्याने त्याचा दाब छातीवर पडतो. त्याचा थेट परिणाम शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण आधीपासूनच कमी असते. स्थुलतेमुळे शरीराची मोकळेपणाने हालचाल करता येत नाही. अशी परिस्थितीत कोरोना झाल्यास रुग्णाच्या उपचारातील गुंतागुंत वाढण्याची शक्यता असते. यामागे रुग्णांच वाढलेलं पोट हे मुख्य कारण असतं.

उपचारातील अडथळे

पोट वाढलेल्या कोरोनाबाधीत रुग्णाला जास्त दाबाने व्हेंटीलेटर लावावे लागते. बाय-पॅक मशिनची गरजदेखिल जास्त लागते. कारण, पोट जास्त खाली दाबल्याशिवाय रुग्णाचा श्वासोच्छास होऊ शकत नाही. अशा रुग्णांना फिजिओथेरपी करणेही कठिण असतं. पोटाच्या आकारामुळे अवयवांच्या हालचालीवर मर्यादा आलेल्या असतात. सर्वसाधारणतः शरीरातील ऑक्सिजन कमी झाल्यानंतर रुग्णाला पोटावर झोपायला सांगितले जाते. पण, या रुग्णांमध्ये हा साधा उपायही कठिण ठरतो.

वैद्यकीय सल्ला

पोट वाढल्याने रक्तातील चरबीचे प्रमाण वाढलेले असते, रक्तदाब, मधुमेह असतो. त्यामुळे पोट वाढलेल्या रुग्णांनो स्वतःची व्यवस्थित काळजी घ्या. पोट वाढणे हा आजार समजून कोरोनाच्या काळात पोटोचा घेर कमी करण्याचा प्रयत्न करावा. तसेच, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या.

हे करा

- रोज श्वसनाचे व्यायाम करावे

- आहारात प्रोटीनचे प्रमाण वाढवावे

- वजन कमी करण्याची औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी

- रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण नियमित तपासावे

असा केले विश्लेषण

- पुण्यात गेल्या एक वर्षात आठशे रुग्णांचा अभ्यास करण्यात आला.

- 40 ते 45 वर्षे वयोगटातील वजन कमी असलेले रुग्ण कोरोनातून लवकर बरे झाले.

- पोट जास्त असलेल्या रुग्णांना खूप दिवस उपचार करावे लागले. त्याच्या उपचारातील गुंतागुंत वाढली.

कोरोनानंतरचे दुष्परिणाम

- मधुमेह होण्याच्या पूर्वीची स्थिती असलेल्या रुग्णांना लगेच मधुमेह होतो.

- काही रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्य असते. पण, स्टुरॉईस् वापरल्याने साखरचे प्रमाण वाढते. त्यातून म्युकमायकोसिसच्या शक्यता वाढते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: कर्णधार ऋतुराजचं शानदार अर्धशतक; ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराटलाही टाकलं मागे

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT