Concession stamp duty house taken in the name of women 
पुणे

हे भारीये! महिलांच्या नावे घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सवलत

सकाळवृत्तसेवा

पुणे : मुद्रांक शुल्कात दिलेली सवलत उद्यापासून (एक एप्रिल) संपुष्टात येत आहे. त्यामुळे आता पूर्वी प्रमाणेच सहा टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. दरम्यान महिलांच्या नावे सदनिका अथवा घर खरेदी केल्यास त्यांना एक टक्का मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचा नवीन निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. उद्यापासून (गुरूवार) ही सवलत लागू होणार आहे.

कोरोनामुळे निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन, बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारने सप्टेंबरमध्ये मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ३१ डिसेंबर अखेरपर्यंत मुद्रांक शुल्कात तीन टक्के, तर जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत २ टक्के सवलत देण्यात आली होती. नागरिकांनीदेखील या सवलतीचा मोठ्या प्रमाणावर फायदा घेतला. परंतु ही सवलत नवीन आर्थिक वर्षात कायम राहणार का, सवलत योजनेला मुदत वाढ मिळणार का, याकडे बांधकाम क्षेत्राबरोबरच नागरीकांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात दिलेल्या सवलतीला मुदत वाढ न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता पूर्वीप्रमाणेच सहा टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे.

खेड-शिवापूर टोल नाक्यावरून प्रवास करताय, मग ही बातमी नक्की वाचा

दरम्यान, महिलांच्या नावे सदनिका, घर अथवा रो हाऊस खरेदी केल्यास त्यांना मुद्रांक शुल्कात एक टक्क्यांची सवलत देण्याचा नवा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे महिलांच्या नावावर व्यवहार केल्यास सहा ऐवजी पाच टक्केच मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. असे आदेश महसूल खात्याचे कार्यासन अधिकारी प्रितमकुमार जावळे यांनी आज काढले. मात्र, त्यासाठी राज्य सरकारकडून काही अटी घालण्यात आल्या आहेत.

अन्यथा दंड आकरणार
महिलांच्या नावावर घर खरेदी केल्यानंतर एक टक्का मुद्रांक शुल्कात सवलत मिळणार आहे. मात्र ही सवलत घेल्यानंतर संबंधित महिलेला १५ वर्षांपर्यंत त्यांची विक्री करता येणार नाही. दरम्यानच्या कालवधीत जर विक्री केल्याचे निदर्शनास आले, तर मुद्रांक शुल्कात दिलेली एक टक्का सवलत आणि त्यावर दंड आकारून तो वसूल करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मुंबईकडे प्रवास सुरू; दोन वाहने आणि दोन रुग्णवाहिका सोबत, पाटोद्यात पहिला मुक्काम

बुलडोझर कारवाईत मर्यादा ओलांडली; हायकोर्टानं अधिकाऱ्यांना फटकारलं, इमारत पुन्हा बांधा आणि १० लाख देण्याचे आदेश

Latest Marathi News Update : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBIचा FIR; ठाकरे पिता-पुत्रांसह रिया चक्रवर्ती, डिनो मोरिया यांच्या चौकशीची मागणी

Maharashtra SET Exam 2026 : सेट परीक्षेच्या तारख्येत पुन्हा बदल! आता 27 ऐवजी 'या' दिवशी होणार परीक्षा, विद्यापीठाची नवीन घोषणा

SCROLL FOR NEXT