Child Labour sakal
पुणे

'बालमजुरीतून मुक्तता आणि पुनर्वसन' विषयावरील ऑनलाइन कार्यशाळा संपन्न

बालहक्क कृती समितीच्या पुढाकारातून ‘बालकांची बालमजुरीतून मक्तता व पुनर्वसन’ या विषयावर सामाजिक कार्यकर्त्यांसाठी ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असल्याने शहर व ग्रामीण परिसरामध्ये बालमजुरीचे प्रमाण वाढण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. याच अनुषंगाने बालहक्क कृती समितीच्या पुढाकारातून ‘बालकांची बालमजुरीतून मक्तता व पुनर्वसन’ या विषयावर सामाजिक कार्यकर्त्यांसाठी ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध सामाजिक संस्थेतील १०० सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. (Pune News)

या कार्यशाळेत पुणे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी परम आनंद, ॲड. आनंद महाजन, कागद काच पत्रा कष्टकरी संघटनेचे आदित्य व्यास, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्‍वर जाधवार, न्यास संस्थेचे रोहीत यालीगार आणि डोअर स्टेप स्कूलचे हरीश फडके यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये बालमजुरी रोखणायसाठी तसेच, बालमजूर काम करत असताना सामाजिक कार्यकर्त्यांची भूमिका काय असायला पाहिजे ? या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

सध्याच्या परिस्थितीमध्ये बालमजुरीचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. अशा बालमजुरांचे पुनर्वसन करने ही शासनाची जबाबदारी आहे. असे ॲड महाजन यांनी सांगितले.या प्रसंगी बालहक्क कृती समितीचे समन्वयक सुशांत आशा यांनी शासनाने बालमजुरीच्या तक्रारीची नोंद घेण्यासाठी बनविलेल्या पेन्सिल पोर्टलची माहिती दिली. त्याचप्रमाणे कुठेही बालमजुरी दिसल्यास www.pencil.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन तक्रार नोंदवावी असे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT