kothrudd1.jpg 
पुणे

धक्कादायक : कोथरुडमध्ये नेमके कोरोना बाधित रुग्ण किती याबाबत संभ्रम

सकाळवृत्तसेवा

कोथरुड (पुणे) : कोथरुडमध्ये आज नव्याने दोन रुग्णांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. हे लोक रहात असलेल्या भागात यापूर्वी चार जण कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. त्यामुळे या भागात रुग्ण संख्या वाढू नये याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

दरम्यान, कोथरुडमध्ये रहायला असणा-या एका डॉक्टरांचा तपासणी अहवाल हा 19 तारखेलाच पॉझिटीव्ह आला होता. परंतु, ते डेक्कनच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्यांची नोंद घोले रोड क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत करण्यात आली आहे. तसेच कोथरुडच्या वस्ती भागात आढळलेली एक कोरोना पॉझिटीव्ह महिला ही वानवडी भागातून आल्याने तिची नोंद त्याच भागात करावी असे कोथरुड मधील डॉक्टरांचे म्हणणे आहे.

वस्ती भागात आढळलेली महिला व कोथरुडमध्ये राहणारे परंतु आता डेक्कनला खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले डॉक्टर यांना कोथरुडमध्ये मोजल्यास आजपर्यंत कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या लोकांची संख्या 15 होते. यापैकी पाच जण कोरोना मुक्त झाले असून एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याने सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या नऊ आहे. मात्र, कोथरुड मधील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या सात असल्याचे महानगरपालिकेच्या स्थानिक अधिका-यांचे म्हणणे आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

एखाद्या रुग्णाला कोथरुडमध्ये मोजले किंवा न मोजले तरी याभागात संसर्ग वाढणार नाही याची दक्षता नागरिक आणि महापालिकेच्या अधिका-यांना घ्यावी लागणार आहे. नव्याने तपासणी करण्यात आलेल्यांचे अहवाल काय येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नव्याने रुग्ण वाढू नये म्हणून काय करावे याचा विचार आता महापालिकेचे अधिकारी करत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambernath: काय हा निर्लज्जपणा! भ्रष्टाचार करा पण अति नको; उपनगराध्यक्षाचं सभागृहातच विधान, नगरसेवक दात काढून हसले

Where is Cabo Varde? मेस्सी अन् अर्जेंटिनाची झोप उडवणारा केप व्हर्दे कुठेय माहित्येय? ५ लाख लोकसंख्या, दहा बेटांचा एक देश, जो नकाशात शोधूनही सापडत नाही...

Latest Marathi Live Update: कोंढव्यात रस्ते खोदकामामुळे भीषण वाहतूक कोंडी

Nashik Hotel FDA Raid : अन्न व औषध प्रशासनाचा राज्यभर मोठा धडाका! नाशिकमध्ये 20 हॉटेल्सवर अचानक धाड; 4 हॉटेल्स तातडीने बंद करण्याचे आदेश, 9 परवाने निलंबित

PF New Rule: PF मध्ये 1800 रुपयांपेक्षा जास्त जमा करायचे का? नवीन नियमात कुणाचा फायदा, कुणाचे नुकसान?

SCROLL FOR NEXT