Students_Exam
Students_Exam 
पुणे

बारावीच्या विद्यार्थ्यांचे वाढता वाढे 'टेन्शन'; परीक्षेबाबत संभ्रम कायम

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दरवर्षीचा डिसेंबर महिना म्हटलं की बारावीचा अभ्यासक्रम जवळपास शिकवून पूर्ण झालेला असतो आणि विद्यार्थ्यांचा 'स्टडी पिरेड' सुरू होतो. अर्थात या काळात विद्यार्थी वर्षभर केलेल्या अभ्यासाची उजळणी, सराव करायला सुरवात करतात.

यंदा मात्र, डिसेंबर महिना सुरू झाला तरी अद्याप केवळ 60 ते 70 टक्के अभ्यासक्रम ऑनलाइनद्वारे शिकवून झाल्याची माहिती समोर येत आहे. एकीकडे ऑनलाईनद्वारे उर्वरित अभ्यासक्रम शिकणे आणि दुसरीकडे परीक्षेबाबत असणारा संभ्रम अशा वातावरणामुळे बारावीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे 'टेन्शन' वाढू लागले आहे.

ऑनलाईन शिक्षणाद्वारे बारावीचा बऱ्यापैकी म्हणजे साधारणत: 60 ते 70 टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला असला, तरी अद्याप परीक्षेबाबत विद्यार्थी संभ्रमात आहेत. विद्यार्थ्यांचा लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षेचा सराव कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत सुरू आहे. परंतु परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन? यंदाचे ऑनलाईन शिक्षण, कमी केलेला अभ्यासक्रम याचा विचार करता परीक्षा नेमक्‍या कशा होणार ? याबाबत विद्यार्थ्यांमध्ये अद्याप गोंधळाचे वातावरण असल्याचे दिसून येते. 

अर्थात, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा एप्रिल-मे महिन्यात बारावी आणि दहावीच्या परीक्षा होतील, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे (नियमित) परीक्षा अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकतीच सुरवात केली आहे. परीक्षेचा अर्ज भरण्याबाबत विद्यार्थी प्रचंड उत्सुक असल्याचे निरीक्षण प्राचार्यांनी नोंदविले आहे. यानिमित्ताने विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता त्यांनी परीक्षा पद्धती आणि स्वरूप याबाबत प्रचंड संभ्रम असल्याचे सांगितले.

विज्ञान शाखेतून बारावीच्या परीक्षेची तयारी करणारी ओमिका काळे म्हणते, "ऑनलाईन शिक्षणात बऱ्याच अडचणी येत आहेत. मोबाईल स्टोरेज, नेटवर्कची समस्या सातत्याने भेडसावत आहे. महाविद्यालयामार्फत नियमितपणे शिकविले जात आहे. परंतु ऑनलाईन शिक्षणाचा फारसा सराव नसल्याने ग्रास्पिंग पॉवर कमी पडत आहे. त्यामुळे अभ्यासक्रम पुर्ण करणे, त्यानंतर सराव आणि मग बोर्डाच्या परीक्षा कशा होणार, याचे चिंता सतावत आहे.''

शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव म्हणाले,""या कालावधीत दरवर्षी विद्यार्थ्यांचा "स्टडी पिरेड' सुरू झालेला असतो. परंतु यंदा ऑनलाईन शिक्षण असले, तरी याद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत अधिक सक्षमपणे कन्टेंट पोचत आहे. सध्या प्रात्यक्षिक परीक्षेचा सराव ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. परंतु जानेवारीपासून नियमितपणे वर्ग सुरू झाल्यास प्रात्यक्षिकांचा सराव करून घेण्यावर भर दिला जाईल.''

"आतापर्यंत 60 ते 70 टक्के अभ्यासक्रम शिकवून पुर्ण झाला आहे. परंतु ऑनलाईन शिक्षणात कला शाखेच्या विद्यार्थ्यांना भाषा, तर वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना अकौंन्टस्‌ आणि विज्ञान शाखेच्या गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र विषय शिकणे अवघड जात असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.''
- राजकुमार गायकवाड, मुख्याध्यापक, श्री सयाजी नाथ महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चऱ्होळी-आळंदी रोड  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT