Congress activist  Rambhau Barate passed away
Congress activist Rambhau Barate passed away 
पुणे

काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते रामभाऊ बराटे यांचे निधन

सकाळवृत्तसेवा

वारजे माळवाडी : जिल्हा परिषदेचे बांधकाम आरोग्य समितीचे 'माजी' सभापती रामभाऊ बाबासाहेब बराटे (वय 70) यांचे हृदयविकाराने शुक्रवारी रात्री निधन झाले. त्यांच्या मागे दोन विवाहित भाऊ, पत्नी, दोन विवाहित मुले, दोन विवाहित मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या घरात विठ्ठल मंदिर होते. त्यांचे आजोबा व वडील वारकरी संप्रदायात होते.

कोरोनापूर्वी वारजे जकात नाका परिसरात झालेल्या आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होते. त्यांचा सामाजिक जीवनातील शेवटचा कार्यक्रम ठरला. काही दिवसांपूर्वी त्याना कोरोनाची लागण झाली होती त्यातून ते बरे देखील झाले होते. परंतु हृदयविकाराच्या आजारावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते त्यातच त्यांचे निधन झाले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

रामभाऊ हे काँग्रेसचे व माजी शिक्षण मंत्री प्रा.रामकृष्ण मोरे यांचे कट्टर समर्थक होते. सध्याचे हवेली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सचिन बराटे यांचे ते वडील होत. वारजे गावचे माजी सरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य, व काँग्रेसच्या विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. वारजे माळवाडीतील वाहतूक व्यवस्था व रस्त्यावरील अतिक्रमण यावर ते आग्रहाने नेहमी बोलत असे. सरपंच असताना वारजे गावासाठी दर माणशी 100 लिटर पाणी योजना राबविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यासाठी खडकवासला धरणातून बंद जलवाहिनीतून पाणी आणून जलशुद्धीकरण केंद्र अशी पाणी योजना पूर्ण केली. खानापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणे, वारजे परिसरात ओढ्यावर पूल बांधणे अशा कामासाठी तसेच वारजे विकासात त्यांचा मोलाचा वाटा होता. 

मराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली

त्यांनी भूषविलेली पदे-
-1975 - युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष वारजे ब्लॉक,
-1973 ते 1984- या दोन पंचवार्षिक मध्ये वारजे गाव चे उपसरपंच व सदस्य
-1984 ते 1995-  या दोन पंचवार्षिकमध्ये वारजे गावचे सरपंच व सदस्य
-1983 ते 1989- जिल्हा उपाध्यक्ष युवा कॉंग्रेस
-1987ते 88- पुणे बाजार समितीचे सभापती
-1988- सरपंच परिषदेचे महाराष्ट्र याचे अध्यक्ष
-1989- वारजे येथे श्रीराम अर्बन को- ऑप. क्रेडीट सोसायटी अध्यक्ष
-1992-97 पुणे जिल्हा परिषद सदस्य 
-1995 ते 1997- जिल्हा परिषदेचे सार्वजनिक बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती
-1997- पुणे जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस
-2002 व 2007 मध्ये महापालिकेची काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविली.
-2017- काँग्रेसचे जिल्हा कार्यकारणी सदस्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT