पुणे

Vidhan Sabha 2019 : पुण्यात शिंदे विरुद्ध टिळक, बहिरट विरुद्ध शिरोळे

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 
पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज (मंगळवार) दुसरी यादी जाहीर केली असून, कसब्यातून नगरसेवक अरविंद शिंदे यांना तर शिवाजीनगरमधून दत्तात्रय बहिरट यांनी उमेदवारी मिळाली आहे.

भाजपने आज आपल्या 125 उमेदवारांची यादी जाहीर करताना पुण्यातील आठही उमेदवारांची घोषणा केली होती. त्यामध्ये कसब्यातून महापौर मुक्ता टिळक, तर शिवाजीनगरमधून माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. आता काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत शिवाजीनगरमधून दत्ता बहिरट आणि कसब्यातून अरविंद शिंदेंची घोषणा झाल्याने काँग्रेस आणि भाजपमधील थेट लढत पाहायला मिळणार आहे. 

काँग्रेसने यापूर्वी जाहीर केलेल्या यादीत कॅन्टोन्मेंटमधून रमेश बागवे यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि मित्रपक्षांनी कोथरूड मतदारसंघ मित्रपक्षांना सोडल्यात जमा आहे. येथून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उभे असल्याने त्यांच्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेते राजू शेट्टी लढण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि आघाडीतील मित्रपक्षांनी ही खेळी केल्याचीही माहिती मिळत आहे. त्यामुळे पुण्यात शत प्रतिशत असलेल्या भाजपला आघाडीकडून टक्कर मिळणार का हा प्रश्न आहे.

शिंदे यांचा सामना भाजपच्या उमेदवार आणि शहराच्या महापौर मुक्ता टिळक यांच्याशी तर बहिरट यांचा सामना सिद्धार्थ शिरोळे यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे. शिंदे यांना पक्षात रविंद्र धंगेकर यांच्याशी तर बहिरट यांना मनीष आनंद यांच्याशी उमेदवारीसाठी सामना करावा लागला. शिंदे हे सध्या महापालिकेत काँग्रेसचे गटनेते असून बहिरट हे माजी नगरसेवक आहेत. दोघेही पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरत आहेत. काँग्रेसने या पूर्वी शहराध्यक्ष रमेश बागवे यांची पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे काँग्रेसचे आता 3 उमेदवार जाहीर झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar : माझ्या मुलीसारखी, पण चुकी झाली! एकटीला पाहून भररस्त्यात छेड काढली, तरुणीनं धडा शिकवताच धरले पाय

Pune Metro : 'कारशेड'साठी जागाच नाही! पुणे मेट्रोच्या चौथ्या टप्प्यात मोठा अडथळा; CWPRS ने प्रस्ताव फेटाळला

Jayant Patil vs Gopichand Padalkar : ‘...राव तेवढा ढापलेला कारखाना परत द्या’ भर चौकात लावला पोस्टर, जयंत पाटील, गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद टोकाला

काठीला कापड गुंडाळल्यासारखी दिसते... बारीक असल्याने 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीला हिणवलं; अनुभव सांगत म्हणाली-

Pune Redevelopment : लोकमान्यनगरचा पुनर्विकास राजकीय आणि 'म्हाडा'च्या हस्तक्षेपामुळे थांबला! नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT