jayram Ramesh
jayram Ramesh 
पुणे

तीन राज्यांनी काँग्रेसला दिली संजीवनी : जयराम रमेश

सकाळवृत्तसेवा

पुणे : छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या तीन राज्यांनी काँग्रेसला संजीवनी दिली, तरी त्याची सुरवात मात्र गुजरात निवडणुकीनंतरच झाली होती, असा विश्वास माजी केंद्रीयमंत्री जयराम रमेश यांनी व्यक्त केला.

'सकाळ' कार्यालयात भेट दिली असता त्यांनी काँग्रेसविषयी भूमिका व्यक्त केली. रमेश म्हणाले, काँग्रेसची पराभूत मानसिकतेतून बाहेर पडायला सुरवात गुजरात निवडणुकीनंतरच झाली. तिथे सत्ता आली नसली तरीही शहरी भागातील काही जागा काँग्रेसने जिंकल्या. भाजपला गुजरातमध्ये शंभर जागांचा टप्पा गाठता आला नाही. त्यातून काँग्रेस कार्यकर्त्यांना मानसिक बळ मिळाले. त्यानंतर कर्नाटकमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस पुढे आला. त्यातून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आत्मविश्वास मिळाला. तेथे सरकार स्थापण्यासाठी काँग्रेसने गतिमान हालचाली केल्या.

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीने काँग्रेसला खऱ्या अर्थाने संजीवनी दिली. पंधरा वर्षे भाजपची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार आले. राजस्थान आणि छत्तीसगड या भाजपचा बालेकिल्ला असलेल्या हिंदी पट्ट्यामध्ये काँग्रेसने नेत्रदिपक कामगिरी केली. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला. पुढील निवडणुकीच्या आव्हानासाठी काँग्रेस कार्यकर्ते तयारीला लागले. त्यामुळेच उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि बिहार येथे स्वबळावर लढण्यासाठी कार्यकर्ते मागणी करत आहेत. मोदींची मार्केटिंग उत्तम आमच्या सरकारच्या काळात सुरु केलेल्या योजनांची नावे बदलून मोदी सरकारने स्वच्छ भारत, जनधन, उज्ज्वला, सौभाग्य असे नाव बदलून त्याचे जोरदार मार्केटिंग केले. त्यामुळे त्यांनी केलेल्या योजना या काँग्रेस सरकारच्या काळातच सुरु झालेल्या आहेत.

मोदींनी प्रचारासाठी एक वर्षे खूप मेहनत घेतली. त्यापूर्वी दोन वर्षांपासून ते स्वतःचे मार्केटिंग करत होते. मोदींमध्ये मार्केटिंग कला उत्तम आहे, असे जयराम रमेश यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT