पुणे

काँग्रेसने महापालिकेला अशी केली मदत 

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोना संसर्गजन्य रोगाशी सामना करणारे डॉक्टर्स, नर्सेस, त्यांचा स्टाफ, पोलीस कर्मचारी यांच्या मदतीसाठी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी गेले अडीच महिने पुण्यात कार्यरत आहेत. त्याच मदतकार्यात आमदार शरद रणपिसे यांनी आमदार निधीतून तीस लाखाचे वैद्यकीय साहित्य महापालिकेला भेट दिले.

महापालिका भवनात प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, माजी आमदार मोहन जोशी यांच्या हस्ते आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यामध्ये १२९०पीपीई किट, ५८ इन्फ्रारेड थर्मामीटर, ७५०० व्हायरल ट्रान्स्पोर्ट मिडीयम आदी साहित्याचा समावेश आहे.

कोरोना विरोधात लढणाऱ्या प्रत्येक घटकाला उपयुक्त ठरेल अशी मदत कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी केली आहे.आमदार रणपिसे यांनी वैद्यकीय साहित्य आमदार निधीतून दिले, आमदार अनंतराव गाडगीळ यांनी पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेन्टच्या रुग्णालयाला तसेच पुणे महापालिकेच्या रुग्णालयांसाठी वैद्यकीय उपकरणे दिली.लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी अन्नदान, मोबाईल क्लिनिकद्वारे पहिल्या टप्प्यातील मोहिमेत सतरा हजाराहून अधिक नागरिकांची मोफत वैद्यकीय तपासणी आणि मोफत औषधोपचार केले, स्थलांतरित परप्रांतीय मजुरांसाठी रेल्वे गाडीची आणि प्रवासातील जेवणाची व्यवस्था, हजारो गरजू कुटुंबियांना महिनाभर पुरेल असे धान्याचे किट, पुण्यात अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी भोजन व्यवस्था अशा स्वरूपात गेले अडीच महिने सातत्याने मदतकार्य चालू ठेवून कोरोनाविरोधी लढाईला बळ दिले आहे, माजी आमदार  जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: अशोक खरातच्या मुलाने दिली धक्कादायक कबुली... आई कुणाकडे पैसे द्यायची? उत्तर ऐकून पोलिसही चक्रावले

Gold Rate Today: युद्धाचा परिणाम! सोन्याच्या भावात मोठी उलथापालथ; पाहा ताजे भाव

Solapur Car Accident : पहाटे भीषण अपघात ! कार कॅनॉलमध्ये कोसळली, जावई बचावला मात्र पत्नीसह सासू-सासऱ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

Latest Marathi News Live Update : साखरपा येथे खाजगी प्रवाशी ट्रॅव्हल्स जळून खाक, मोठा अनर्थ टळला

Good Friday 2026: आज 'हॅपी गुड फ्रायडे' का म्हणत नाहीत? जाणून घ्या यामागचं खरं कारण आणि इतिहास

SCROLL FOR NEXT